काय नेमकं प्रकरण?
हत्या झालेल्या महिलेचे नाव अंजू दासारी असे आहे. ती घरकाम करून आपल्या दोन मुलींसह जवाहरनगर भागात राहत होती. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांची मोठी मुलगी रोशनी कुमारी हिने आई बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. आई कामावर गेल्यावर परतलीच नाही, असे तिने तक्रारीत म्हटले होते. सुरुवातीला पोलिसांनी हा बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला, मात्र अनेक महिने उलटूनही अंजू यांचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता.
Baramati Crime: देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण! भररस्त्यात मारहाण करून कारखाली चिरडलं; बारामतीतील घटना
तपासादरम्यान पोलिसांना अंजु यांच्या धाकट्या मुलीच्या वागण्यावर आणि जबाबावर संशय आला. तिने प्रत्येक वेळी चौकशीत वेगवेगळी माहिती दिल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांनी जेव्हा तिचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा ऑटो चालक माँटी कुमार सिंह याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या दोघांच्या लग्नाला अंजू दासारी यांचा कडाडून विरोध होता, हाच विरोधाचा राग मनात धरून मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढण्याचे ठरवले.
१७ मार्च रोजी पोलिसांनी ऑटो चालक माँटी आणि अंजु यांच्या धाकट्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी कठोर चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, हत्येननंतर दुर्गंधी येऊ नये आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी बेडरूममध्येच खड्डा खणून मृतदेह पुरला आणि वरून पक्के काँक्रीट केले. बुधवारी फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत पोलिसांनी बेडरूम खोदून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Ans: घरातील बेडरूममध्ये जमिनीत पुरलेला.
Ans: मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे.
Ans: मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.






