Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ज्याच्या हातात लहानपणी खेळलं, त्याच हाताने आजोबांचा खून! कारण काय?

परळी शहरात दारू व मोबाईलसाठी पैसे न दिल्याच्या रागातून नातवाने आजोबांना अमानुष मारहाण केली. गंभीर दुखापतींमुळे आजोबांचा मृत्यू झाला. पोलिस तपासात हा खून उघडकीस येत आरोपी नातवाला अटक करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 31, 2026 | 02:15 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • परळीतील मिलिंदनगरमध्ये नातवाने आजोबांची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना
  • दारूच्या व्यसनामुळे पैसे न दिल्याचा राग कारणीभूत
  • सुरुवातीला आकस्मिक मृत्यू; पोलिस तपासात खून असल्याचा उलगडा
बीड: बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहानपणी ज्यांच्या हातात खेळलो, आई-वडिलांनंतर ज्यांनी सर्वाधिक प्रेम दिलं, त्या आजोबांवरच नातवाने हात उचलल्याची ही हृदयद्रावक घटना आहे. आजी-आजोबा आणि नातवंडांचं नातं म्हणजे मायेचा आधार आणि आयुष्यभराच्या आठवणींचा खजिना. मात्र परळीत घडलेल्या या घटनेने या पवित्र नात्यालाच काळिमा फासला आहे. नातवाने अमानुष मारहाण केल्याने आजोबांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Hingoli Crime: 69 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार, आधी चॉकलेट आणि पैसे दिले नंतर…

नेमकं काय घडलं?

मृत व्यक्तीचं नाव रामभाऊ विठ्ठल गायकवाड (वय 73) असं असून आरोपी नातवाचं नाव शुभम बाळू गायकवाड (वय 27) आहे. रामभाऊ हे पत्नी द्रोपदाबाई गायकवाड यांच्यासह परळीतील मिलिंदनगर भागात वास्तव्यास होते.

तपासात समोर आलं आहे की शुभम हा दारूच्या व्यसनाधीन असून तो वारंवार दारू आणि मोबाईलसाठी पैशांची मागणी करत होता. घटनेच्या दिवशी शुभमने आजोबांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र रामभाऊ यांनी पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून शुभमने आजोबांवर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

ही मारहाण छाती आणि पोटाच्या भागावर करण्यात आली होती. त्यामुळे रामभाऊ गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती खालावत गेली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

संशयास्पद मृत्यूचा उलगडा

घटनेनंतर कुटुंबीयांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. चौकशीत नातवाने केलेल्या मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मृतकाच्या पत्नी द्रोपदाबाई गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नातू शुभम गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून 30 जानेवारी रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

परिसरात संतापाची लाट

दारू आणि पैशांच्या मागणीमुळे घडलेल्या या घटनेने मिलिंदनगर परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

‘कॉन्फिडेंट ग्रुप’च्या कार्यालयात थरार; छापेमारीत उद्योजकाने स्वतःवर झाडली गोळी

💡

Frequently Asked Questions

  • Que: परळीतील घटनेत नेमकं काय घडलं?

    Ans: दारू व मोबाईलसाठी पैसे न दिल्यामुळे नातवाने आजोबांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

  • Que: आरोपी आणि मृत व्यक्ती कोण आहेत?

    Ans: मृत व्यक्ती रामभाऊ विठ्ठल गायकवाड (73) असून आरोपी नातू शुभम बाळू गायकवाड (27) आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: संशयास्पद मृत्यूचा तपास करून नातवाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Beed crime the same hands that played with him in childhood were used to murder his grandfather what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Hingoli Crime: 69 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार, आधी चॉकलेट आणि पैसे दिले नंतर…
1

Hingoli Crime: 69 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार, आधी चॉकलेट आणि पैसे दिले नंतर…

Beed Crime: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! बनावट नोटा प्रकरणात केजचा माजी सरपंच गजाआड
2

Beed Crime: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! बनावट नोटा प्रकरणात केजचा माजी सरपंच गजाआड

Thane Crime: आईच्या डोळ्यांसमोर अपहरण! मुंब्र्यातून तीन महिन्यांचं बाळ पळवलं; फिल्मी स्टाईलने 6 दिवसांनी सुखरूप सुटका
3

Thane Crime: आईच्या डोळ्यांसमोर अपहरण! मुंब्र्यातून तीन महिन्यांचं बाळ पळवलं; फिल्मी स्टाईलने 6 दिवसांनी सुखरूप सुटका

Uttarpradesh Crime: थट्टेच्या एका वाक्याने मोडलं आयुष्य; पतीच्या अपमानानंतर तरुण विवाहितेने संपवलं जीवन
4

Uttarpradesh Crime: थट्टेच्या एका वाक्याने मोडलं आयुष्य; पतीच्या अपमानानंतर तरुण विवाहितेने संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.