crime (फोटो सौजन्य : social media)
बीडमध्ये चाललंय तरी काय? असा प्रश्न आता उभा झाला आहे. कारण बीड मध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर अनेक धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आले आहे. आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ४ पानी सुसाईड नोट लिहून ठेवलं आहे. त्या चिट्ठीत राजकीय व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Baba SiddiqueMurder Case : मोठी अपडेट; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मोबाइल क्रमांक वापरून…..
नेमकं काय प्रकरण?
आत्महत्या करण्याऱ्या व्यक्तीचे नाव राम असाराम फटाले (42) असे आहे. राम फटालेने सावकारी जाचामुळे आत्महत्या केली आहे. रामने आत्महत्या करण्यापूर्वी चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवला असून यात भाजपा भटके विमुक्त आघाडीचे डॉ. लक्ष्मण जाधव आणि यांच्या पत्नीचाही उल्लेख आहे. सात जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप देखील केला आहे. या घटनेनंतर पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पेठ बीड पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी डॉ. लक्ष्मण जाधव यांच्यासह सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे असे पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज यांनी सांगितले आहे.
सुसाईड नोटमध्ये काय?
प्रिय आई व पप्पा, सुजल व गौरी, रेणुका मी चांगला मुलगा पती वडील होऊ शकलो नाही, तरी मला माफ करा..रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील, सुजल व गौरी यांची काळजी घ्यावी लागेल..शाम भाऊ, लखन, माझे मुले व बायको, आई-वडील यांचा सांभाळ करा व मला माफ करा..तुमचा सर्वाचा राम…माझे वडील यांच्याकडे माझी माती करण्यासाठी रुपये नाहीत.. माझी माती समाजाकडून वर्गणी करून करावी.. माझा दहावा, तेरावा, चौदावा करू नका.. कुणालाही मयतीला बोलावू नका.. वर्षश्राद्ध करू नका ही माझी इच्छा आहे… असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.