crime (फोटो सौजन्य- social media)
Beed Crime News: बीडमधून धक्कादायक घटना समोर आली. प्रेम संबंधातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे शिवम काशिनाथ चिकणे (२१ वर्ष) असे आहे. तो अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावामधीलचं एका मुली सोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीने घरी बोलावले असतांना त्यावेळी अचानक नातेवाईक तेथे आले आणि त्याच्यात वाद झाला. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शिवमला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
धक्कादायक ! सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. नांगोळे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सासू आणि सुनेचा मृत्यू झाला तर वडील आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने सांगलीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५) असे मृत सासूचे, तर काजल समीर पाटील (वय ३०) असे सुनेचे नाव आहे. अल्लाउद्दीन मकबूल पाटील (वय ५५) आणि समीर अल्लाउद्दीन पाटील (वय ३५) या पिता-पुत्राची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कुटुंबातील दोन बालके मात्र सुखरूप आहेत. नांगोळे-ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचे घर आहे. घरामध्ये अल्लाउद्दीन मकबूल पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील व काजल समीर पाटील यांच्यासह दोन लहान मुले राहतात.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी शेजारील वृध्द महिला पाटील यांच्या घरी आली असता, चौघेही निपचिप पडलेले दिसले. तिने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले. घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरामध्ये पाहणी केली असता, चार ग्लास आढळले.