
crime(फोटो सौजन्य- social media)
कन्नड तालुक्यात भरदिवसा एकाची हत्या; सकाळी आठला शेतात गेला अन् नंतर…
काय नेमकं प्रकरण?
आरोपी जावयाचे नाव अमित लांजेवार (36) असे आहे. तर मृतकाचे नाव किशोर कंगाले (वय 60) असे आहे. किशोर कंगाले हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांना एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीने अमित लांजेवार याच्यासोबत आंतरजातीय विवाह केला आहे. या विवाहाला सुरुवातीपासून कंगाले यांचा विरोध होता. त्यामुळं कंगाले हे कोकणागड इथं राहून शेती सांभाळत होते. मुलीच्या आंतरजातीय विवाहमुळे मुलगी आणि जावयाला संपत्ती आणि त्यांची कुठलीही मालमत्ता देणार नाही, असा संशय जावयाला निर्माण झाला होता. त्यामुळे जावयाने सासऱ्याचा कट काढण्याचा निर्णय घेतला.
9 जानेवारी रोजी कंगाले हे नेहमी प्रमाणे कोकणागडवरून शिंगोरी येथे आपल्या शेतावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. यावेळी अमित व त्याच्या मित्राने त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर गळा दाबून खून केला. त्यांनतर हत्या करून त्यांचा मृतदेह शेतशिवारातील पुलाखालील पाईपमध्ये लपवून ठेवला. कंगाले यांच्या मुलीने आपल्या वडिलांशी संपर्क साधला मात्र संपर्क झाला नाही. म्हणून मुलीला संशय बळावला. तिने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी आपली तपासाची सूत्र वेगाने हलवत शोध सुरु केला. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी जावई अमित लांजेवारला नागपुरातून तर त्याचा मित्र योगेश पाठकला रामटेकमधून अटक केली आहे.
Beed Crime: मुलगा नाही म्हणून विवाहितेचा छळ; बीडमध्ये तीन मुलींच्या आईची आत्महत्या
Ans: : भंडारा जिल्ह्यातील कोकणागड परिसरात ही घटना घडली.
Ans: मृत व्यक्तीचं नाव किशोर कंगाले (वय 60), सेवानिवृत्त मुख्याध्यापक.
Ans: संपत्ती मिळणार नाही, या संशयातून जावयाने ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.