crime (फोटो सौजन्य: social media)
भांडारा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी डॉक्टरने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. आरोपी डॉक्टरच नाव देवेश अग्रवाल असे आहे. ही घटना साकोली येथे ९ जुलैला घडली होती. पीडितेच्या ताकारीवरून त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.
नेमकं काय घडलं?
९ जुलैला पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत आरोग्य तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने मुलीशी डॉक्टरने सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले. पीडितेने साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवालच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बँक खातं केलं फ्रीज
डॉक्टर देवेश अग्रवाल विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, अटकेची कारवाई टाळण्यासाठी डॉक्टर तेव्हापासून फरार असून पोलिसांचं विविध पथक त्याच्या शोधात महाराष्ट्रातील विविध शहरासह लगतच्या राज्यांमधीलही त्याच्या नातेवाईकांकडं जाऊन परतली आहे. मात्र अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नाही. पोलिसांनी तो देशभरात फिरत असतानाचं डॉक्टर विदेशातही फरार होऊ शकतो, असा संशय निर्माण केला आहे. भंडारा पोलिसांनी डॉक्टर अग्रवालच्या विरोधात लुक आऊट नोटीस बजावला आहे. यासोबतच त्याचं बँक खातं फ्रीज करून पासपोर्ट आणि हॉस्पिटलचा परवाना हि रद्द करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
नागपूर येथे एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. जेव्हा आरोपी प्रियकराचे खरे रूप पुढे आले तेव्हा तिला धक्काच बसला. यामध्ये तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी नागपूर येथील अजनी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तुमसर येथे सोमवारी (दि.21) वर्ग होताच घटनेचे बिंग फुटले. सदर गुन्ह्यात तुमसर पोलिसांनी प्रियकर प्रिंस भजनलाल मेश्राम (वय 22) व त्याचे आई-वडील भजनलाल मेश्राम (वय 48), रागिनी भजनलाल मेश्राम (वय 40, तिघेही रा. आंबेडकर वॉर्ड, तुमसर) यांच्याविरुद्ध अत्याचार तथा आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या संघटित गुन्ह्यांतर्गत नोंद घेतली आहे.
आरोपी प्रियकराच्या घरी लग्नाच्या आश्वासनावर तुमसरात दाखल झाली होती. मात्र, आरोपींनी तिला सलग 2 दिवस घराबाहेर ठेवून राधाला त्रास दिल्याची माहिती फिर्यादी बहिणीने पोलिसांना दिली.
त्यातूनच राधाने 17 जुलै रोजी विषारी औषध पिऊन शहरातील गांधी सागर तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात ती थोडक्यात बचावली होती. प्रकृती नाजूक असल्याने तिला भंडारा येथून नागपूर हलविण्यात आले होते. घटनेच्या दिवशी नागपूरला उपचारादरम्यान ती दगावली. सदर आरोप करत फिर्यादी बहिणीने अजनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.