सौजन्य फोटो - नवराष्ट्र टिम
अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव ऋषीकेश गणेश पाडेकर (वय २६, रा. संतवाडी, ता. जुन्नर) असे आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रास्त्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार LCB चे पथक जुन्नर विभागात गस्त घालत असताना, आळेफाटा-संतवाडी रस्त्यावर एका तरुणाकडे बेकायदेशीर गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी लागलीच सापळा रचून ऋषीकेश याला ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
स्थानिक गुन्हे शाखेने हे सर्व बेकायदेशीर शस्त्रसाठा तात्काळ जप्त केला असून, आरोपी ऋषीकेश पाडेकर याला पुढील तपासासाठी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असून आळेफाटा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, विश्वास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, राजू मोमीन, अमित माळुंजे, पंकज पारखे, विनोद गायकवाड, तसेच पोलीस शिपाई अक्षय नवले, अभिमन्यू मोटे आणि ओमकार खुणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Ans: ऋषीकेश गणेश पाडेकर (वय २६) या तरुणाला बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
Ans: ही कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आळेफाटा परिसरातील संतवाडी रोडवर केली.
Ans: आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.






