Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander Crime News : दोस्त दोस्त ना रहाँ; मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत जात असल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसात दोन हत्या झाल्याने भाईंदर शहर हादरुन गेले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 13, 2025 | 05:43 PM
वसई किल्ल्यात अघोरी कृत्य, मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पिता पुजारी, मुलाला अटक

वसई किल्ल्यात अघोरी कृत्य, मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पिता पुजारी, मुलाला अटक

Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर, विजय काते: दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत जात असल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसात दोन हत्या झाल्याने भाईंदर शहर हादरुन गेले आहे. अवघ्या दोन दिवसांत शहरात दोन वेगवेगळ्या हत्या घडल्या असून, दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.पहिली घटना भाईंदर पश्चिम येथील असून, एका तरुणाने वैयक्तिक वादातून आपल्या मित्राचा कोयत्याने निर्घृण खून केला. ही घटना शहरातील मुर्दा खाडी परिसरात घडली. या प्रकरणातील आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 48 तासांत पुणे येथून अटक केली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे व सूत्रांच्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवून ही यशस्वी कारवाई केली आहे.

 

10 जून रोजी रात्री उशिरा, भाईंदर पश्चिम येथील मुर्दा खाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. संजय शर्मा (वय 36) या व्यक्तीने आपल्या 46वर्षीय जुना मित्र अनीस नबी याचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. दोघेही जुने मित्र असून काही दिवसांपूर्वी अनीस नबी काही काळासाठी संजयच्या घरी राहायला आला होता.

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, संजय शर्मा हा पेंटर म्हणून काम करतो आणि मुर्दा खाडी परिसरातील एका चाळीत भाड्याने राहतो. अनीस नबीच्या मुक्कामादरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाले, परंतु तो वाद इतका टोकाचा गेला की, रागाच्या भरात संजयने घरात असलेल्या कोयत्याने अनीसवर प्राणघातक हल्ला केला. अनीसच्या मानेवर आणि छातीवर वार करण्यात आले आणि  जागीच त्याचा जीव गेला .

घटनेनंतर संजय शर्मा फरार झाला. यानंतर भायंदर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासाच्या दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक माहितीचा वापर करून आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढला.

केवळ ४८ तासांच्या आत मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून संजय शर्माला ताब्यात घेतले. सध्या आरोपीकडून चौकशी सुरू असून, खुनामागील नेमका वाद काय होता, याचा शोध घेतला जात आहे. विशेष बाब म्हणजे संजय आणि अनीस यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

Sangli Crime : झोपेतच पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव, 15 दिवसापूर्वीच झालं होतं लग्न; आरोपी पत्नीला अटक

दुसरीकडे 12 जून रोजी भाईंदर पूर्वेकडील कनकिया म्हाडा वसाहतीत 24 वर्षीय युवकाने आपल्या प्रेयसीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. करिश्मा (पूर्ण नाव गोपनीय) असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार केल्यामुळे ती जागीच ठार झाली.

या प्रकरणात शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हसीफ (वय 24, व्यवसाय – शेफ) याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्मा आणि शमशुद्दीन यांच्यात काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात तणाव आणि वाद निर्माण झाले होते.

घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला आणि संतप्त झालेल्या शमशुद्दीनने धारदार शस्त्र घेऊन करिश्माच्या गळ्यावर वार केला. हा प्रकार तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये घडला. तिच्या रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला. माहिती मिळताच मीरा रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. यानंतर अवघ्या चार तासांत पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपी शमशुद्दीनला अटक केली. आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Couple Missing in Sikkim: सिक्कीममध्ये आणखी एक जोडपे गायब; दोन आठवड्यांपासून शोध सुरू

या दोन्ही घटनांनी मीरा-भाईंदर परिसरात मोठी खळबळ उडवून दिली असून, प्रेमसंबंध व व्यक्तिगत वादातून होणाऱ्या हिंसाचाराबाबत चिंतेचे वातावरण आहे. मात्र, पोलीस दलाच्या जलद आणि प्रभावी कारवाईने नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 

Web Title: Bhayander crime news friends are not friends friend brutally murdered friend accused in police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • crime news
  • crime news marathi
  • Meera Bhayander News

संबंधित बातम्या

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
1

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
2

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
3

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…
4

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.