
pune crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे : अनेक जण सध्या पैसे गुंतवले तर अधिकचा परतावा मिळेल अशी आश्वासन देत असतात. वेगवेगळ्या स्किम काढून अनेकांना गंडा घातल्याव्या तक्रारी आपण पाहिल्या असतील. पुण्यात पण अशीच एक घटना घडली आहे. एका व्यावसायिकला जवळपास ३७ लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राइड ग्रुपचे निरजन शहा यांचा समावेश आहे. हे प्रकरण सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल आहे.
कशी केली फसवणूक ?
चतुःशृंगी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पाटील यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. डिसेंबर २०२२ ते २०२३ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकरण घडल आहे. सुरुवातीला राजेंद्र पाटील यांना २६ लाख रुपये गुंतवणूक करा अस सांगितलं. त्यांनी ती गुंतवणूक पण केली ऑक्टोबर पर्यंत त्यांना परतावा मिळाल. मात्र इतर रकमेची मागणी केली असता त्याना काही मिळाल नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आल की आपली फसवणूक झाली आहे.
पुणे पोलिसांनी गुन्हे केले दाखल
हे प्रकरण सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल आहे. पुणे पोलिसांनी तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र जवळपास ३७ लाखाला गंडा घातल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आर्थिक अमिषापायी पैसे गुंतवून ठेवायची आपण स्वप्न पाहतो मात्र फसवणूक झाल्यावर आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे व्यवहार करताना खात्री असेल तरच करावा.
पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; कोंढव्यातून संशयित दहशतवाद्याला अटक
पुण्यात गेल्या आठवड्यात दहशतवादी विरोधी पथकाकडून कोंडव्यामध्ये दहा ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. या दहा ठिकाणी एटीएसच सर्च ऑपरेशन सुरू होत. त्यात टाकलेल्या छाप्यात एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद्यांना मदत मदत केल्याच्या संशयावरून एटीएसने पुण्यात दहा ठिकाणी छापे टाकले होते. छाप्यामध्ये अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करून आता त्याची चौकशी केली जात आहे.
Jalgao Crime: जळगावात दुर्दैवी अपघात; रुळ ओलांडताना दोन तरुणांचा मृत्यू, नात्याने मामा–भाचे