
crime (फोटो सौजन्य: social media)
• शिक्षिका प्रियाने गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट आढळली
• मृत्यूपूर्वी 5.5 लिटर दुधाचे पैसे देण्याची सूचना
• पती व सासरच्यांकडून छळाचा माहेरच्यांचा आरोप
बिहार: मरणाच्या उंबरठ्यावर उभी असतानाही एका आईला जगाची देणी आठवली. कोणाचाही पैसा आपल्या मागे राहू नये, याची काळजी घेत एका शिक्षिकेने आयुष्य संपवलं. प्रामाणिकपणाचा असा असामान्य आदर्श ठेवून गेलेली ही घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात सेहन गावामध्ये घडली असून, तिच्या सुसाईड नोटने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे.
ताडीवाला रस्ता परिसरात वाद, दोन गटात हाणामारी; नेमकं काय घडलं?
काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव प्रिया भारती (३०) असे आहे. प्रिया ही शिक्षिका असून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. प्रियाने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी अधिक भावनिक आणि डोळे पानावतील अशी आहे.
चिठ्ठी काय?
मला रसुळपूर या माझ्या मूळ गावी नेऊ नका, माझे अंत्यसंस्कार याच ठिकाणी करा. विशेष म्हणजे, माझ्या पार्थिवाला अग्नी माझ्या पतीच्या हाताने न देता, माझ्या 3 महिन्यांच्या मुलीच्या हाताने द्यावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. तिने लिहिले की, माझे 5.5 लिटर दुधाचे पैसे देणे बाकी आहे, ते माझ्या पर्समध्ये ठेवलेल्या पैशातून देऊन टाकावे. आजारी असल्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे, असे तिने चिठ्ठीत लिहिले असले तरी, तिच्या पतीबद्दलचा राग सुसाईड नोटमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. तिने आपला मोबाईल पतीकडे देण्यास सांगितले असून त्यात काही महत्त्वाचे मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ असल्याचेही नमूद केले आहे. आई-बाबा, तुमची मुलगी हारली आहे, मला माफ करा, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माहेरच्यांनी केले गंभीर आरोप
प्रियाच्या माहेरच्या लोकांनी गंभीर आरोप केले आहे. प्रियाचा पती दीपक राज आणि सासरच्या मंडळींकडून तिचा छळ होत होता, तिने या त्रासाबद्दल आपल्या आईला आधीच कल्पना दिली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.
तपास सुरु?
प्रियाच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून मंगळवारी पोस्टमार्टम करण्यात आले. सब डिव्हिजनल पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. परंतु अध्याप मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही.
Ans: बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सेहन गावात.
Ans: प्रिया भारती, वय 30 वर्षे, शिक्षिका.
Ans: कोणालाही जबाबदार धरू नये, देणी फेडण्याची विनंती आणि भावनिक संदेश.