संग्रहित फोटो
गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी अजय आनंद भालशंकर (वय २९, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) याने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोनू काळे, दस्तूर नदाफ, गणेश काळे, रफीक नदाफ, इस्माइल नदाफ, साहिल नदाफ, भूषण भंडारी (सर्व रा. प्रायव्हेट रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी किरकोळ वादातून घरातील महिलांना मारहाण केली. अजयचा भाऊ अमर याच्या दुचाकीची तोडफोड केली, असे भालशंकर याने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करत आहेत.
तर अक्षय उर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय ३३, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) याच्या तक्रारीवरून अक्षय भालशंकर, अजय भालशंकर, अमर भालशंकर, आम्रपाली अक्षय भालशंकर, पूनम अजय भालशंकर, अरुणा भालशंकर, दीपाली, रुपाली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रायव्हेट रोड परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी किरकोळ वादातून आरोपींनी काळे आणि त्याचा मित्र भूषण भंडारीला मारहाण केली. गीता घाटे यांना मारहाण करण्यात आली, असे काळे याने तक्रारीत म्हटले आहे.
टोळक्याकडून तिघांना दगडाने मारहाण
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चाकण परिसरातील कडाची वाडी येथे भाईगिरीचा आव आणत एका तरुणाला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांना दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (१८ जानेवारी) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बापदेव वस्ती येथील ओमसाई नगर कॉर्नर येथे घडली आहे. या प्रकरणात प्रविण विष्णू कुंभार (४८, बापदेव वस्ती, मेदनकरवाडी) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सयश राजेंद्र यादव, शिवम संदीप हाके, शुभम संदीप हाके (१८, कडाची वाडी), चिन्मय वाघ, सुदर्शन चौधरी, सोन्या वाघमारे आणि विराज कृष्णा कड (२३, कडाचीवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील शुभम हाके आणि विराज कड या दोघांना अटक केली आहे.






