दुचाकी खांबाला धडकल्याने दोन ठार
बिहारमधील कटिहार येथे सोमवारी एक भीषण अपघात घडला आहे. यात लग्नातील ८ पाहुण्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना पोठिया पोलीस स्टेशन परिसरात घडली असून चांदपूर येथील हनुमान मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला स्कॉर्पिओकार धडकल्याने हा भीषण अपघात झालाय. ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर २ जण गंभीर जखमी आहे. जखमींना प्राथमिक उपचारानंतर जीएमसीएच (पूर्णिया) येथे रेफर करण्यात आलंय. हे सर्व १० जण एकाच स्कॉर्पिओमधून प्रवास करत असताना हा अपघात झाला. तर घटनेतील सर्व मृत पूर्णियाच्या बधरा कोठी येथील धिबरा बाजारचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याणमध्ये ॲम्बुलन्ससाठी 1000 रुपये नसल्याने महिलेचा मृत्यू; दोन लहान मुले अनाथ
अपघटनानंतर परिसरातील लोकांची गर्दी जमली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कटिहारच्या कुर्सेला पोलीस स्टेशन हद्दीतील कोशीकपूर येथे लग्नाचा कार्यक्रम होता. त्यासाठी वरात जात असताना वाटेत हा अनर्थ घडला.चांदपूर चौकात मक्याचा ढीग पाहून चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर स्कॉर्पिओ थेट मक्याने भरलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय.
या अपघातात २ जण जखमी झाले आहे. जखमींचे नाव उदय कुमार आणि अभिषेक कुमार असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही सुमारे २५-२६ वर्षांचे असल्याची माहिती पुढे आली आहे. मृतांचे नाव आणि अधिक कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. मृतांची माहिती गोळा केली जात आहे. मात्र अपघाताच्या या बातमीनंतर लग्नाच्या आनंदात शोककळा पसरली आहे.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?
एका प्रत्यक्षदर्शी आणि लग्नाच्या पक्षातील एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही दुचाकीवरून मागे होतो. रस्त्यावर मक्याचा ढीग होता. स्कॉर्पिओ पुढे जात असताना समोर एक ट्रॅक्टर उभा होता. त्यात मक्याचे दाणे भरलेले होते. मक्याच्या कणसाच्या ढिगाऱ्यावर चढल्यानंतर, स्कॉर्पिओ नियंत्रणाबाहेर गेली आणि पार्क केलेल्या ट्रॅक्टरला धडकली. त्या व्यक्तीने पुढे सांगितले की, आम्ही बरहरा कोठी (पूर्णिया) येथील धिब्रा बाजारातून लग्नाच्या समारंभासाठी येत होतो. त्यासाठी आम्हाला कोष्कीपूरला जायचे होते. स्कॉर्पिओमध्ये चालकासह एकूण 10 जण होते. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र नवरदेव या गाडीत नव्हता. या गाडीत फक्त लग्नाचे पाहुणे होते. असेही तो म्हणाला.