kdmc (फोटो सौजन्य : social media)
कल्याण (ठाणे): कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. केवळ 1000 रुपयांची रक्कम नसल्यामुळे रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याने एका 35 वर्षीय महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे तिच्या दोन चिमुकल्या मुलांचे जीवन अंधारात गेले आहे.
बारामतीत १११ ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर; वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
सविता बिराजदार (वय 35), कोळसेवाडी, कल्याण पूर्व येथील रहिवासी, यांना शरीराचा एक भाग अचानक सुन्न झाल्यामुळे त्यांना तातडीने बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्यामुळे आणि उपलब्धता नसल्यामुळे सवितांना तब्बल पाच तास रुग्णालयातच थांबावे लागले. त्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
108 ॲम्बुलन्स उपलब्ध, पण चालक…
नातेवाईकांनी विनंती करूनही रुग्णालयाने ॲम्बुलन्स देण्यासाठी 1000 रुपये मागितले. नातेवाईकांकडे ती रक्कम नसल्याने त्यांनी 108 क्रमांकावर कॉल केला. या सेवेत देखील ॲम्बुलन्स उपलब्ध नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर 108 नंबरची ॲम्बुलन्स उभी होती, पण त्यात चालक किंवा डॉक्टर कोणीच उपस्थित नव्हते.
2-3 रुग्ण झाले की ॲम्बुलन्स नेऊ
कल्याण डोंबिवली महापालिकेकडे 4 ॲम्बुलन्स असूनही चालकांच्या अनुपस्थितीमुळे त्या निष्क्रियपणे उभ्या आहेत. एका चालकाने स्पष्टपणे सांगितले की, 2-3 रुग्ण झाले की ॲम्बुलन्स घेऊन जाऊ. अशा असंवेदनशीलतेमुळे सविता यांचे प्राण गेले.
आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार
हा प्रकार केवळ एक अपवाद नाही. गेल्या दोन महिन्यांत तीन महिलांचा मृत्यू केडीएमसीच्या रुग्णालयांतील निष्काळजीपणामुळे झाला आहे. शक्तीधाम रुग्णालयात भुलीच्या चुकीमुळे शांतीदेवी मौर्या यांचा मृत्यू झाला, तर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीवेळी सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणांमध्येही डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले.
या घटनेनंतर केडीएमसीचे वैद्यकीय विभाग उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी रुग्णालयात भेट देऊन संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली आणि दोषींवर 48 तासांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, निलंबनाची शक्यता आहे.
घरातील कर्त्या
सविता बिराजदार या घरातील कर्त्या महिला होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आणि मुलगी अनाथ झाले असून कोळसेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बारामती वाहतूक शाखेची धडक मोहीम; १११ ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर’वर फिरवला बुलडोझर