
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
बिहार राज्यातील बेगुसराय येथील डंडारी गावचा रहिवासी असलेला टोनीश यादव याचे महिन्याभरापूर्वी लग्न झाले होते. तो आठ दिवसांपूर्वी मथार जंली टोला येथील आपल्या सासरी आला होता. गुरुवारी सकाळी तो आपल्या घरी परतणार होता. मात्र सासरहून निघण्यापूर्वीच अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
पोलिसांनी पत्नी, सासू आणि सासऱ्याला घेतले ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत टोनिशची पत्नी, सासू, सासरे आणि मेव्हणी अशा चौघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावोजी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
टोनिशच्या कुटुंबांनी केले गंभीर आरोप
ही घटना घडल्यानंतर टोनिशच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. टोनिशच्या पत्नीचे तिच्या बहिणीचा पतीसोबत म्हणजेच भावोजीसोबत प्रेमसंबंध होते.हे तिचे दुसरे लग्न होते आणि ती या नात्यात अजिबात आनंदी नव्हती. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी तिने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने हा कट रचल्याचा आरोप टोनिशच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मजुरीचे काम करत होता टोनीश
टोनीश हा पाच भावांमध्ये सर्वात लहान होता. कुटुंबाची आर्थिक ओढताण कमी करण्यासाठी तो मजुरीचे काम करत होता. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या २२ वर्षीय तरुणाचा असा अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहे. मुख्य आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Ans: टोनिश यादव (22).
Ans: पत्नीच्या भावोजीशी अनैतिक संबंध असल्याने पती अडथळा ठरत होता.
Ans: पत्नी व सासरचे चौघे अटकेत; मुख्य आरोपी भावोजी फरार.