crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बिहार: बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालंदा जिल्ह्यातील राजगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेले एएसआय सुमन तिर्की यांनी मंगळवारी (दि. 14) सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस दल आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आत्महत्येमागचं कारण काय?
डीएसपी सुनील कुमार यांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादामुळे घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मात्र, तपास अद्याप सुरू असून अधिकृत कारण निश्चित झालेले नाही.
सुमन तिर्की हे झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील भटौली गावचे रहिवासी होते आणि ते गेल्या वर्षभरापासून राजगीरमध्ये डायल 112 आपत्कालीन सेवेत कार्यरत होते.
फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.
आत्महत्येसाठी वापरलेली सरकारी बंदूक आणि घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण सध्या सुरू आहे.
पोस्टमार्टम अहवालानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
राजगीर परिसरात या घटनेमुळे गंभीर वातावरण निर्माण झाले असून, सहकारी अधिकारी आणि स्थानिकांनी तिर्की यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
तपास सुरूच
राजगीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून, आत्महत्येमागील कारण स्पष्ट करण्यासाठी कुटुंबीयांचे निवेदन व डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. पोलिस विभागाने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मानसिक आरोग्य व समुपदेशन उपाययोजनांवर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.
पत्नीने दिराशी लग्न केल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या
गौरा गावात राहणाऱ्या मोहम्मद आफताबचे ५ वर्षांपूर्वी शबनमशी लग्न झाले होते. आफताब सतत दारू प्यायचा आणि शबनमला मारहाण करत होता. अनेकदा पंचायती झाल्या, पण त्याच्या वागण्यात काही सुधार झाला नाही. तो पैसे कमावत नव्हता, घर खर्चासाठी पैसे देत नव्हता. तेव्हाच शबनम आणि आफ्ताबचा धाकटा भाऊ इम्तियाज यांच्यामध्ये जवळीक वाढली. दोघांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केलं. पण आफताबला हे पटलं नाही. त्याच्या डोक्यात राग होता.
त्याने रागाच्या भरात गुरुवारी उशिरा रात्रीच्या सुमारास जावई मोहम्मद आफताब शबनमच्या आईवर हल्ला केला. त्यावेळी शबनमची आई हि शेतात झोपली होती. ओरडण्याचा आवाज ऐकून शबनम धावत आली, तेव्हा आफताब घटनास्थळाहून पळून गेला. कुटुंबीयांनी शबनमच्या आईला ताबडतोब बीबी कौशरला जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात पोहोचताच तिचा मृत्यू झाला.
आम्ही इथले भाई, माझी माफी माग, नाहीतर…; बारामतीत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न