बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेतात शिक्षिकेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव पुष्पा कुमारी आहे. पुष्पाचा मृतदेह डुमरी रोडवरील सासरच्या घरामागील शेतात आढळला. मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील सुपौल बाजार परिसरात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, शिक्षिकेचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षिका रात्री पळून गेली होती
याप्रकरणात अधिकची माहिती अशी की, मृत शिक्षिका पुष्पा कुमारी ही गौडाबौराम प्रखंडातील गनौनी परसाराम शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. पुष्पाचे माहेर कुशेश्वरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिंडुआ गावात आहे. पुष्पाच्या सासऱ्याने सांगितले की ती रात्री घरातून पळून गेली होती. शिक्षिकेचा पती प्रमोद प्रसाद हादेखील जोगरिया येथील सरकारी शाळेत शिक्षक आहे. तर पुष्पाच्या वडिलांनी सांगितले की प्रमोद कुमार शाहू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन दरभंगा येथील डीएमसीएच रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
मृत शिक्षिकेच्या वडिलांनी काय सांगितले?
शिक्षिकेच्या वडिलांनी सांगितले की, मुलीच्या सासर्यांनी मुलगी पळून गेल्याची माहिती अलीपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कुंवर साहू यांना कळवली होती. त्यांनी मला ही माहिती फोनवरुन दिली होती. मुलगी पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी 7 वाजता ते सुपौल बाजारातील त्यांच्या सासऱ्यांच्या घराजवळ डुमरी येथे पोहोचले. मात्र, त्यांना शेतात मुलीचा मृतदेह आढळला आहे.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला जात आहे. शिक्षिकेची हत्या झाल्याची शंका व्यक्त केली जात असून, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. पोलीस पुढील तपास करत आहे.
एम्समधील नर्सच्या २ मुलांना जिवंत जाळलं, घरात घुसून हत्या
बिहारची राजधानी पटनामधील जानीपूर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटन घडली आहे. गुन्हेगारांनी घरात घुसून एम्सच्या एका नर्सच्या दोन मुलांना जिवंत जाळलं आहे. या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ माजली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. अंजली आणि अंश अशी मृत मुलांची नावं आहेत. शोभा आणि ललन कुमार गुप्ता यांची ही मुलं होती. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट पसरली आहे.