
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळत असताना एका ८ वर्षीय चिमुकलीला फूस लावून घरात नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. रक्ताच्या नात्यातील असलेल्या या २२ वर्षीय तरुणाने तिथे तिचा फायदा घेत, तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर हा प्रकार कोणाला सांगितला, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.
मामी अंघोळ घालत असताना पोट सुजलेल दिसले
घटनेनंतर पाच दिवसांनी, म्हणजेच रविवार, ८ मार्च रोजी, मामी मुलीला अंघोळ घालत असताना तिच्या पोटावर सूज दिसून आली. मामीने प्रेमाने विचारणा केली असता, चिमुकलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. हे ऐकताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर, कुटुंबीयांनी कोरची पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच, कोरची पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीला ताब्यात घेतले आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ रोजी पोलिसांनी जेरबंद केले, ९ रोजी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पो.नि. शैलेंद्र ठाकरे यांनी दिली. उपनिरीक्षक योगेश पवार तपास करत आहेत.
दुर्दैवी! रंग खेळून वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
गडचिरोली येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्रांसोबत वैनगंगा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या २५ वंशीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शुभम नामदेव रामटेके (रा. गायकवाड चौक, आरमोरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Ans: ही घटना कोरची तालुक्यात घडली.
Ans: पीडित मुलगी ८ वर्षांची अनाथ असून तिचा सांभाळ मामा-मामी करत आहेत.
Ans: पोलिसांनी आरोपी मोनुकुमार ढेक याला अटक करून त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.