Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh News : वाळू उत्खनन वादात भाजप नेत्याला फॉर्च्यूनर कारमध्ये जिवंत जाळलं, ३ जण जखमी

Crime News : छत्तीसगडमधील कोरियामध्ये वाळू उत्खननावरुन मोठा वाद निर्माण झाला. या वादाने पुढे जाऊन इतके भीषण रुप घेतले की रात्रीच फॉर्च्यूनर गाडीला आग लावण्यात आली. या आगीत जळून भाजप नेत्याचा मृत्यू झाला असून अन्य तीन सदस्य गंभीर जखमी आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 02:19 PM
Chhattisgarh News : वाळू उत्खनन वादात भाजप नेत्याला फॉर्च्यूनर कारमध्ये जिवंत जाळलं, ३ जण जखमी

Chhattisgarh News : वाळू उत्खनन वादात भाजप नेत्याला फॉर्च्यूनर कारमध्ये जिवंत जाळलं, ३ जण जखमी

Follow Us
Follow Us:
  • वाळू उत्खननाच्या वादातून छत्तीसगडमध्ये हिंसक घटना घडली; एका स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला.
  • वाहनाला आग लागल्याने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
  • पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक तपासाद्वारे घटनेचे नेमके कारण शोधले जात आहे.
छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खनावरुन सुरु झालेल्या वादाने पुढे हिंसक वळण घेतले. सोनहट तहसीलच्या कटगोडी गावात घडलेल्या या धक्कादायक घटनेत, काही लोकांनी एका स्थानिक भाजप नेत्याला त्याच्याच गाडीत जिवंत जाळल्याचा आरोप आहे. यासोबतच अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मृताची ओळख भारत जनता पार्टीचा कार्यकर्ता भरत सिंह उर्फ लल्ला सिंह अशी आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेच्या सर्व पैलूंचा तपास केला जाणार आहे.

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण

गाडीला लावली आग

पोलिसांनी बुधवारी घटनेची माहिती देताना सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी भरत सिंह गहरवार आपल्या साथिदारांसोबत फॉर्च्यूनर गाडीने नवगई गावाच्या दिशेने जात होता. याचवेळी आरोपींनी कथितरित्या एका टिपर वाहनाने त्यांच्या फॉर्च्युनरला अनेक वेळा धडक देऊन तिचे नुकसान केले. त्यानंतर त्यांनी वाहनावर पेट्रोल ओतून त्याला आग लावली.

जखमींवर उपचार सुरु

सांगितले जात आहे की, वारंवार बसलेल्या धडकेमुळे गाडीचे दरावाजे ऑटोमॅटीक लाॅक झाले. यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना गाडीच्या बाहेर निघता आलं नाही. खिडकी फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी फॉर्च्युनरमधील प्रवाशांना मारहाण केल्याचाही आरोप आहे. या घटनेत भाजप नेता गहरवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर फॉर्च्यूनर गाडीत बसलेल्या अन्य तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबिकापुर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी आरोपींना केली अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिस महानिरीक्षक लगेच घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी या प्रकरणात मनोज त्रिपाठी, निशांत त्रिपाठी यांच्यासह एकूण चार जणांना अटक केली आहे. तथापि इतर संशयितांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान अटक केलेला आरोपींचाही भाजपसोबत संबंध असल्याचे म्हटले जात आहे.

Kalyan Crime: काहीतरी भलतंच! जमीन पत्नीच्या नावावर, नातेवाईकांनी केलं जगणं मुश्किल; राग अनावर होत नवऱ्याने केला बायकोचा खून

दोन्ही गटांमध्ये होता वाद

प्राथमिक माहितीनुसार, मृत भरत सिंह आणि आरोपी मनोज त्रिपाठी यांच्यात वाळूच्या व्यावहारावरुन वाद सुरु होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली होती ज्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. दरम्यान पोलिस या घटनेचा आता सखोल तपास करत आहे. जळालेली फॉर्च्यूनर कार फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून, वाहनाला आग पेट्रोल टाकून लावण्यात आली होती की विजेच्या खांबाला धडकल्यामुळे लागली, याचा तपास अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Bjp leader burnt alive in fortuner car over sand mining dispute in chhattisgarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • Fire
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण
1

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.