Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI in Fire Prevention : डिटेक्शन सिस्टीम, अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्सद्वारे आपत्कालीन अलर्ट मिळण्यास मदत

AI in Fire Prevention : मुंबई येथे आयोजित ‘पीएसपी-एएसआयएस कॉन्क्लेव्ह’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सुरक्षा क्षेत्रातील वापरावर चर्चा करण्यात आली आहे. सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी एआयचा योग्य वापर आणि संभाव्य गैरवापर रोखण्यासाठी आवश्यक नियंत्रणाच्या महत्त्वावरही भर दिला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 24, 2026 | 05:34 PM
डिटेक्शन सिस्टीम, अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्सद्वारे आपत्कालीन अलर्ट मिळण्यास मदत

डिटेक्शन सिस्टीम, अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्सद्वारे आपत्कालीन अलर्ट मिळण्यास मदत

Follow Us
Follow Us:
  • अग्निशमन दलाचा प्रतिसाद लवकर मिळण्यास मदत  
  • लहान-मोठ्या सर्वच गोष्टी इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत  
  • इंटरनेटमुळे एआयसारखे प्रभावी तंत्रज्ञान उपलब्ध  
 

AI in Fire Prevention :  “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे सुरक्षा यंत्रणांमधील देखरेख आणि नियंत्रण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या निरीक्षणामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास संशयास्पद हालचाली ओळखण्यासह संभाव्य धोके वेळीच लक्षात घेऊन तातडीने प्रतिसाद देणे शक्य होईल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिक यांनी केले. ‘एआय’मुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम, प्रभावी आणि सुसज्ज होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संतोष वारिक म्हणाले, “सद्यस्थितीत इमारतींची सुरक्षा आणि आगीपासून बचाव (फायर सेफ्टी) या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या बनल्या आहेत. कारखाने, कार्यालये किंवा मॉलमध्ये लोकांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासह संपूर्ण व्यवस्थापन ‘एआय’च्या माध्यमातून करणे शक्य झाले आहे. तसेच, इमारतींमधील आगीच्या सुरक्षेच्या यंत्रणांवरही ‘एआय’द्वारे नजर ठेवता येणे सहज शक्य आहे.

अग्निशमन दलाचा प्रतिसाद लवकर मिळण्यास मदत

शासनाने ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट’ मध्ये २०२३ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. इमारतीमध्ये आगीच्या सुरक्षेसाठी बसवलेले डिटेक्शन सिस्टीम्स, अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्सद्वारे आपत्कालीन स्थितीत अलर्ट पाठवले जातात. त्यामुळे कोणत्याही दुर्घटनेवेळी अग्निशमन दलाचा प्रतिसाद लवकर मिळण्यास मदत होईल.”

प्रास्ताविकात सुनील बीडलम यांनी सांगितले की, पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स (पीएसपी) फोरम हे पुण्यातील कॉर्पोरेट, औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सुरक्षा, रिस्क मॅनेजमेंट आणि ऍनालिसिस करणाऱ्या व्यावसायिकांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय घडामोडी, सुरक्षारक्षकांशी संबंधित आव्हाने, प्रवेश नियंत्रण प्रणाली, आपत्कालीन स्थितीतील सज्जता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाते.

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

लहान-मोठ्या सर्वच गोष्टी इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत

पुण्यासह मुंबई आणि अन्य शहरांत या स्वरूपाचे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘सुरक्षा अवॉर्ड्स’सारख्या उपक्रमांद्वारे सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरवही फोरमतर्फे केला जातो.”

ब्रिगेडियर प्रीतपाल सिंग म्हणाले, “एआयच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि भविष्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दिशा मिळाली. आज लहान-मोठ्या सर्वच गोष्टी इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत.

इंटरनेटमुळे एआयसारखे प्रभावी तंत्रज्ञान उपलब्ध

इंटरनेटमुळे एआयसारखे प्रभावी तंत्रज्ञान उपलब्ध झाले असले, तरी त्यावर योग्य नियंत्रण नसल्यास गैरप्रवृत्तींचे लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करू शकतात. त्यामुळे सुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिकांनी एआयचे स्वरूप समजून घेणे, त्याचा योग्य वापर करणे आणि संस्थांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.” सूत्रसंचालन मृणालिनी चतुर्वेदी यांनी केले. मंगेश काटे यांनी आभार मानले.

पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स व अमेरिकन सोसायटी फॉर इंडस्ट्रियल सिक्युरिटी (एएसआयएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआय इन सिक्युरिटी’ संकल्पनेवर ‘पीएसपी-एएसआयएस कॉन्क्लेव्ह’चे आयोजन केले होते. यामध्ये ‘अग्निसुरक्षेमध्ये एआयचा वापर’ यावर वारिक बोलत होते. मुंबईतील आयकॉनिका हॉटेल येथे झालेल्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे सहसंचालक किरण हत्याल, ‘पीएसपी’चे सहसंस्थापक सुनील बीडलम व मंगेश काटे, बँक ऑफ बडोदाच्या सुरक्षा विभागाचे राष्ट्रीय प्रमुख ब्रिगेडियर प्रीतपाल सिंग, सिक्युरिटी शेल्स इंफोटेकचे संचालक महेश गव्हाणे, बायॉन अनॅलिटीक्सचे व्यवस्थापकीय संचालक राजीव नायर, सुरक्षा सेवा क्षेत्रातील प्रमुख अधिकारी नंदकिशोर भट, मोहित भूगणि, कुणाल भोगल, स्वप्नील कुटे, सुमित शहा, ब्रिगेडियर सुनील कुमार, सिमएक्सचे पूर्वेस गडा, ‘एएसआयएस’ मुंबई चॅप्टरचे समीर कुमार झा, मार्श मिरांडा, प्रमोद भिलारे, राकेश खेरवा, संपत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. एचएसबीसी बँक इंडियाचे उपाध्यक्ष (प्रोटेक्टिव्ह सिक्युरिटी) निलेश गाडेकर व हॉटेल ग्रँड हयात मुंबईचे सहायक सुरक्षा व्यवस्थापक संतोष भालके यांना सुरक्षा सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!

Web Title: Ai security fire safety santosh warik psp asis conclave mumbai sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • AI App
  • Fire
  • Fire News

संबंधित बातम्या

कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट
1

कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर
2

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर

Bangladesh Fire : भीषण आग ;समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला आग ;१० जणांचा मृत्यू ,सहा जखमी
3

Bangladesh Fire : भीषण आग ;समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला आग ;१० जणांचा मृत्यू ,सहा जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.