Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Crime News: पती, पत्नी और ‘वो’! भाजप नेत्याचे कांड…; गळा घोटून पत्नीची केली हत्या

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रोहितने घरात दरोडा पडल्याचा बनाव रचला होता. त्याने सांगितले की, दरोडेखोर घरात घुसले, दागिने लंपास केले आणि पत्नीची हत्या करून गेले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 17, 2025 | 02:43 PM
BJP Crime News: पती, पत्नी और ‘वो’! भाजप नेत्याचे कांड…; गळा घोटून पत्नीची केली हत्या
Follow Us
Close
Follow Us:

Rajasthan Crime News : राजस्थानातील अजमेरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपच्या नेत्यानेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधामध्ये पत्नी अडथळा ठरत असल्यामुळे भाजप नेत्याने हे भयंकर कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने घरात दरोडा पडल्याचा बनाव रचला आणि मृतदेहाशेजारी बसून रडण्याचे नाटक केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला पोलिसांनी दरोड्याच्या अँगलने तपास सुरू केला होता. मात्र चौकशीत सत्य बाहेर येताच भाजप नेत्यासह त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे.

हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव संजू सैनी आहे. तर भाजप नेत्याचे नाव रोहित सैनी असे आहे. रोहित सैनीने अनैतिक संबंधात पत्नीचा अडथळा येत असल्याने पत्नीलाच संपवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेता रोहित आणि त्याची गर्लफ्रेंड रितू यांची कसून चौकशी केली असता, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रोहितने घरात दरोडा पडल्याचा बनाव रचला होता. त्याने सांगितले की, दरोडेखोर घरात घुसले, दागिने लंपास केले आणि पत्नीची हत्या करून गेले. मात्र तपासादरम्यान पोलिसांना रोहितवर संशय आला. चौकशीत तो वारंवार आपले जबाब बदलत होता. शेवटी पोलिसांनी कडकपणे धाक दाखवला असता, रोहितने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याने सांगितले की, गर्लफ्रेंड रितूच्या दबावामुळेच त्याने पत्नीची हत्या केली. रितूनेच संजूला संपवण्यासाठी रोहितवर दबाव आणला होता. या खळबळजनक घटनेमुळे राजस्थानमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

प्रेयसीसोबत नियोजन

प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, किशनगडमध्ये भाजप मंडल सरचिटणीस नेते रोहित सैनी यांनी त्यांच्या प्रेयसीसोबत नियोजन करून पत्नी संजू सैनी यांची हत्या केली. रोहित आणि रितू दोघेही २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पोलिस चौकशीत असेही समोर आले की, हत्येच्या वेळी रितू उपस्थित नव्हती परंतु नियोजनात सहभागी होती.

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव

काय आहे संपूर्ण प्रकरण

किशनगढमध्ये, रविवार (१० ऑगस्ट) रोजी दुपारी २:०० वाजता, भावाला राखी बांधण्यासाठी जात असताना, सिलोरा भाजप मंडल सरचिटणीस आणि त्यांच्या पत्नीला घेरण्यात आले आणि दरोडा टाकण्यासाठी भरदिवसा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात, रोहितच्या पत्नीचा गळा आरोपींनी कापला. पोलिसांनी रुग्णालयात रोहितची वैद्यकीय चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिस आता इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Bjp leader strangles wife to death in rajasthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • BJp leader
  • Rajsthan

संबंधित बातम्या

Supreme Court  News: सरकारी भरती आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; खुल्या प्रवर्गातील जागा सर्वांसाठी खुल्या
1

Supreme Court News: सरकारी भरती आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; खुल्या प्रवर्गातील जागा सर्वांसाठी खुल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.