Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतमाळमध्ये काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघड; मजुरांच्या खात्यातून 100 कोटींची उलाढाल, पोलिसांचा सहभाग

यवतमाळ मधून काळापैसा पांढरा करण्याचा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2025 | 08:42 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

Yavatmal : यवतमाळ मधून काळापैसा पांढरा करण्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील अनेक मजुरांच्या खात्याचा वापर करून तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा पैसा आयपीएलमधील असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तू राज ठाकरेंच्या घरी जा, मी तुला विकत घेऊ शकतो; अर्धनग्न अवस्थेत मनसेच्या नेत्याच्या मुलाची हुल्लडबाजी

नेमकं काय आहे प्रकरण?

काळा पैसे पांढरा करण्यासाठी यवतमाळमधील अनेक मजुरांच्या खात्याचा वापर करण्यात आलं असून त्यामार्फत तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा पैसे आयपीएलमधील असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात यवतमाळमधील पांढरकवडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीसनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. श्रीकांत करलावर आणि श्रीधर चव्हाण यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना यवतमाळच्या पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये घडली आहे. गावात रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुरांच्या नावाने बँकेत खाते उघडून त्यात मार्च ते जून २०२५ या तीन महिन्यात तब्बल १०० कोटींच्या घरात उलाढाल झाल्याचं दिसून आलं आहे.

पांढरकवडा तालुक्यातील चोपण, वाघोली, वसंतनगर, दहेली तांडा या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या तक्रारीनुसार, मयूर चव्हाण याने अनेकांची आधारकार्ड आणि विविध कागदपत्रं घेतली होती. त्यानंतर गावातील किरण राठोड याच्या खात्यात एक कोटी 16 लाख रुपये आले. काही वेळातच ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळती झाल्याची माहिती मिळाली. हा प्रकार माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांना समजतात त्यांनी बँकेकडे विचारणा केली. त्यानंतर असाच प्रकार शेकडो खात्यांमध्ये झाला असल्याचा प्रकार समोर आला. पांढरकवडा पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दिली. मात्र पोलिसही कारवाई करीत नसल्याचा आरोप संतोष बोरेल यांनी केला.

पांढरकवडा माजी नगराध्यक्ष काय म्हणाले?

या प्रकरणी पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष संतोष बोरले म्हणाले की, “चंद्रपूरच्या एका व्यक्तीने काही मुलांना हाताशी धरून त्यांच्या नावाने अकाउंट उघडून घेतले. त्या बदल्यात काम देतो असं आश्वासन त्याने दिलं होतं. अकाउंट खुले झाल्यानंतर एक ते दीड कोटी प्रत्येकाच्या अकाउंटवर जमा झाले आणि परस्पर पैसे काढण्यात आल्याचं समोर आलं. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर अधिकचा तपास केला असता अशा प्रकारची कोट्यवधी रक्कम अनेकांच्या नावावर काढण्यात आल्याचं समोर आलं.”

ज्या विद्यार्थ्यांच्या नावावर अकाउंट काढण्यात आलं होतं त्यांच्यावर आता सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलं आहे. या क्रिकेट, लँड माफिया, खाणींचा पैशाचे व्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत अशी माहिती संतोष बराले म्हणाले.

पुण्यात लुटमारीच्या घटना वाढल्या; चोरट्यांनी एकाला रस्त्यात अडवले अन्…

 

Web Title: Black money laundering exposed in yavatmal rs 100 crore turnover from laborers accounts police involved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • black money
  • Crime . Crime News
  • yavatmal news

संबंधित बातम्या

ओव्हरलोड कोळसा वाहतूक ठरतेय जीवघेणी! अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेस धोका
1

ओव्हरलोड कोळसा वाहतूक ठरतेय जीवघेणी! अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेस धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.