कॉमेडियन कमिल शर्माला धमकावणाऱ्याला अटक, 1 कोटींच्या खंडणीची केली होती मागणी (फोटो सौजन्य-X)
kapil sharma Death Threat News Marathi: बॉलीवूड अभिनेता आणि विनोदी कलाकार कपिल शर्माला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव दिलीप चौधरी आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीने कपिल शर्माच्या पीएला फोन करून १ कोटी रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
कपिल शर्माला धमकी दिल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच, गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. तपासानंतर गुन्हे शाखेने पश्चिम बंगालमधून आरोपीला अटक करून मुंबईत आणले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून आणि धमकीमागील हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपी आणि बिश्नोई टोळीमध्ये कोणताही संबंध नसल्याचे समोर आले आहे.
फोनवरून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. २२-२३ सप्टेंबर रोजी बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने कपिल शर्माच्या पीएला फोन करून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. कपिलच्या पीएने या प्रकरणाची माहिती मुंबई पोलिसांना दिली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दिलीप चौधरीला बंगालमधील उत्तर परगणा येथून अटक केली.
चार दिवसांपूर्वी (२२-२३ सप्टेंबर), बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने विनोदी कलाकार कपिल शर्माच्या पीएला फोन करून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. कपिलच्या पीएने या प्रकरणाची माहिती मुंबई पोलिसांना दिली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दिलीप चौधरीला बंगालमधील उत्तर परगणा येथून अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांना अद्याप दिलीप चौधरीचा बिश्नोई टोळीशी कोणताही संबंध आढळलेला नाही.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींनी विनोदी कलाकाराला फोन करून धमकी देणारे व्हिडिओ पाठवले. विनोदी कलाकाराला २२ आणि २३ सप्टेंबर रोजी आरोपींकडून अंदाजे सात फोन कॉल आले. चौधरीने रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार सारख्या गुंडांच्या नावाने धमक्या दिल्या आणि विनोदी कलाकाराकडून १ कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त आहे.
नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या कपिल शर्माच्या शो “द ग्रेट इंडियन कपिल शो” चा तिसरा सीझन नुकताच संपला आहे. सध्या अनुकल्प गोस्वामी दिग्दर्शित “किस किसको प्यार करूं २” या चित्रपटाचे चित्रीकरण देखील करत आहे. मूळतः २६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता, त्याची रिलीज तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला पहिला भाग एका विवाहित विनोदी कलाकाराची कथा सांगतो जो तीन पत्नींसह आहे.