Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bombay Dyeing: बॉम्बे डाईंगने बनावट वस्तूंविरुद्ध कडक कारवाई, ग्राहक आणि ब्रँडचा वारसा जपण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

बॉम्बे डाईंगने आपल्या नावाचा गैरवापर होत असल्याची बाबही उघड केली आहे. बनावट उत्पादने जांभळ्या रंगाच्या लोगोसह विकली जात आहेत, तर मूळ (ओरिजिनल) बॉम्बे डाईंगचा लोगो निळा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2025 | 03:59 PM
बॉम्बे डाईंगने बनावट वस्तूंविरुद्ध कडक कारवाई, ग्राहक आणि ब्रँडचा वारसा जपण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

बॉम्बे डाईंगने बनावट वस्तूंविरुद्ध कडक कारवाई, ग्राहक आणि ब्रँडचा वारसा जपण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • बॉम्बे डाईंग नावाचा गैरवापर
  • बनावट उत्पादनावर जांभळ्या रंगाचे लोगो
  • बॉम्बे डाईंगचा लोगो निळा

भारतातील सर्वात जुने आणि सर्वात प्रतिष्ठित घरगुती कापड ब्रँडपैकी एक असलेल्या बॉम्बे डाईंगने बनावट वस्तूंविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. बॉम्बे डाईंगने कोलकाता, हैदराबाद, केरळ आणि अलिकडेच मुंबईतील एका प्रमुख मॉलमध्ये छापे टाकून बनावट उत्पादनांविरुद्धची आपली लढाई अधिक मजबूत केली आहे. १४५ वर्षांहून अधिक काळाचा वारसा असलेला हा ब्रँड नेहमीच विश्वास, नावीन्य आणि तडजोड न करता येण्याजोग्या गुणवत्तेसाठी उभा राहिला आहे. विश्वास आणि गुणवत्तेशी तडजोड न करणारा ब्रँड अशी आतापर्यंतची आपली ओळख कायम ठेवण्यास बॉम्बेडाईंग कटिबद्ध आहे.

‘क्राईम पेट्रोल’ पाहून बाप लेकानं आखला कट! स्वतःवर वार करून रचला २७ लाखांच्या लुटीचा बनाव; पण एका संशयाने…

या कारवाईचा एक भाग म्हणून, बॉम्बे डाईंगने आपल्या नावाचा गैरवापर होत असल्याची बाबही उघड केली आहे. बनावट उत्पादने जांभळ्या रंगाच्या लोगोसह विकली जात आहेत, तर मूळ (ओरिजिनल) बॉम्बे डाईंगचा लोगो निळा आहे. हे लक्षात घेता ग्राहकांनी खरेदी करताना लोगो काळजीपूर्वक तपासावा, असे आवाहन बॉम्बे डाईंगने ग्राहकांना केले आहे. आपण बॉम्बे डाईंगची खरी उत्पादने खरेदी करत आहेत याची खात्री ग्राहकांनी करावी, असेही आवाहन ब्रँडने आपल्या ग्राहकांना केले आहे.

बॉम्बे डाईंगच्या निष्ठावंत ग्राहकांचे रक्षण करणे हा या कारवाईमागे कंपनीचा उद्देश आहे. या बरोबरच जेव्हा कोणी “बॉम्बे डाईंग” खरेदी करते तेव्हा त्यांना ब्रँडची ओळख असलेले प्रामाणिक आणि दर्जेदार उत्पादन मिळायला हवे. याची खात्री करण्याच्या व्यापक वचनबद्धतेचा देखील ही कारवाई एक भाग आहे. बनावट उत्पादने केवळ निकृष्ट दर्जाच्या वस्तू मूळ वस्तू म्हणून देऊन ग्राहकांना केवळ आर्थिकदृष्ट्याच फसवत नाहीत, तर बॉम्बे डाईंगने पिढ्यानपिढ्या निर्माण केलेल्या विश्वासालाही हानी पोहोचवतात. कंपनीच्या खऱ्या दर्जेदार आणि विश्वासार्ह उत्पादनाची नक्कल करता येत नाही, दर्जेदार उत्पादनांचा पर्याय बनावट उत्पादने कधीही होऊ शकणार नाही, या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी कंपनी अशा अनैतिक कृत्यांवर कारवाई करत आहे.

बॉम्बे डाईंगचे सीएफओ खिरोदा जेना म्हणतात, “आमची समर्पित टीम उपाय शोधण्यासाठी आणि बनावट उत्पादनांविरुद्ध लढण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. बॉम्बे डाईंगने उचलेले हे कारवाईचे पाऊल केवळ आमच्या ब्रँडचे संरक्षण करावे, यापेक्षा ते लाखो कुटुंबांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी अधिक आहे. बॉम्बे डाईंग निवडणारे प्रत्येक कुटुंब आमच्या ब्रँडची ओळख असणारी खरी गुणवत्ता, अस्सलपणा आणि विश्वासार्हता अनुभवण्यास पात्र आहे.”

बॉम्बे डाईंग हा ब्रँड केवळ बनावट वस्तू तयार करणाऱ्या उत्पादकांवर पाळत ठेवण्याचे काम करत नसून, स्थानिक अधिकारी, किरकोळ भागीदार आणि उद्योगातील भागधारकांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. या द्वारे एक स्वच्छ, निष्पक्ष बाजारपेठ तयार व्हावी असा कंपनीचा प्रयत्न आहे. या पावलांसह, बॉम्बे डाईंग विश्वास, कालातीत डिझाइन आणि अतुलनीय गुणवत्ता एकत्रित करणारी उत्पादने वितरित करण्यासाठी शतकापूर्वी दिलेले वचन पाळण्याचे ठामपणे सांगत आहे.

Pune Crime: आजकाल लग्न जमवणे झालं धोकादायक ! विवाहसंस्थेच्या नावाखाली फसवणूक; प्रोफाइल बदलून पैसे उकळणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा

Web Title: Bombay dyeing launched strict action against counterfeit goods taking steps to protect the legacy of its customers and brand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Crime News: ‘क्राईम पेट्रोल’ पाहून बाप लेकानं आखला कट! स्वतःवर वार करून रचला २७ लाखांच्या लुटीचा बनाव; पण एका संशयाने…
1

Crime News: ‘क्राईम पेट्रोल’ पाहून बाप लेकानं आखला कट! स्वतःवर वार करून रचला २७ लाखांच्या लुटीचा बनाव; पण एका संशयाने…

Pune Crime: आजकाल लग्न जमवणे झालं धोकादायक ! विवाहसंस्थेच्या नावाखाली फसवणूक; प्रोफाइल बदलून पैसे उकळणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा
2

Pune Crime: आजकाल लग्न जमवणे झालं धोकादायक ! विवाहसंस्थेच्या नावाखाली फसवणूक; प्रोफाइल बदलून पैसे उकळणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा

Satara Crime: रागाचा अतिरेक! सातार्‍यात अल्पवयीन मुलाकडून रुममेटची हत्या; आधी भिंतीवर डोकं आपटलं, नंतर पट्ट्याने…
3

Satara Crime: रागाचा अतिरेक! सातार्‍यात अल्पवयीन मुलाकडून रुममेटची हत्या; आधी भिंतीवर डोकं आपटलं, नंतर पट्ट्याने…

Beed Crime: बीडमध्ये गुन्हेगारांची हाईट ! रात्रीत बँकच फोडली, लाखो रुपये केले लंपास
4

Beed Crime: बीडमध्ये गुन्हेगारांची हाईट ! रात्रीत बँकच फोडली, लाखो रुपये केले लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.