Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बहिणीसमोरच भावावर चाकूने केले सपासप वार; कॉलेज परिसरात हल्ला झाल्याने एकच खळबळ

र्डनमध्ये बसलेल्या भावंडांजवळ दोन युवक आले. तुम्ही कोण आहात आणि येथे का बसला आहात? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर मुझाईदने आपण बहिण-भाऊ असल्याचे सांगितले. तुम्ही कोण आहात? अशी विचारणा केली. त्यातील एकाने आपले नाव सुफियान पठाण सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2026 | 03:49 PM
अॅडमिशनला आले असता हल्ला; बहिणीसमोरच भावावर केले वार

अॅडमिशनला आले असता हल्ला; बहिणीसमोरच भावावर केले वार

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : बी. ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बहिणीसह कॉलेजमध्ये गेलेल्या तरुणावर दोघांनी चाकू व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या छाती, पाठीवर आणि गळ्याजवळ वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर घाटीत उपचार सुरू आहेत. ही घटना १६ जून रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या सुमारास आझाद कॉलेज परिसरात घडली. सुफियान पठाण व त्याचा एक साथीदार अशी चाकूहल्ला करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुझाईद वाहीद कुरेशी (वय २४, रा. इस्ला हाऊसिंग सोसायटी, हर्सल सावंगी) याने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हा त्याची बहीण रश्मीन फातेमा कुरेशी (वय १९) हिच्यासोबत बी. ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आजाद कॉलेजमध्ये गेला होता. प्रवेश विभागातील कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ सुरू असल्याने त्यांना काही वेळ थांबण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दोघे ज्युनियर कॉलेजच्या गार्डनमध्ये बसले होते. गार्डनमध्ये बसलेल्या भावंडांजवळ दोन युवक आले. तुम्ही कोण आहात आणि येथे का बसला आहात? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर मुझाईदने आपण बहिण-भाऊ असल्याचे सांगितले. तुम्ही कोण आहात? अशी विचारणा केली. त्यातील एकाने आपले नाव सुफियान पठाण सांगितले.

तेव्हा फिर्यादीने, त्याला आपका हमारे पास क्या काम है, अशी विचारणा केली. त्यामुळे संतापलेल्या सुफियान पठाण याने फिर्यादीला रुक तेरे को बताते, असे म्हणून त्याने कोणाला तरी फोन लावला व फिर्यादी व त्याच्या बहिणीला शिवीगाळ करु लागला. शिवीगाळ केल्याचा मुझाईदने त्याला जाब विचारताच त्याने चाकूने थेट छातीवर वार केला.

पाठीमागून पकडून वार; गळ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न

सुफियानच्या साथीदाराने मुझाईदला पाठीमागून पकडून ठेवले. त्यानंतर त्याने धारदार वस्तूने पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. तेव्हा मुझाईदला पकडलेल्या साथीदाराने त्याच्या गळ्यावर वार कर असे म्हणाला. त्यानुसार, सुफियान याने मुझाईदच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुझाईदने मान खाली घेतल्याने वार दाढीच्या भागावर लागला आणि मोठा अनर्थ टळला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी रश्मीनला धक्का देत तेथून पळ काढला. बहिणीसमोर घडलेल्या या प्रकारामुळे तीही घाबरून गेली.

घाटीत उपचार; गुन्हा दाखल

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या मुझाईदला तेथील दोन युवकांनी मदत केली. त्यांनी त्याला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांनी त्याला दाखल करुन घेतले नाही. तेव्हा मुझाईदला त्याच्या भावांनी घाटीत दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पसार संशयितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संतोष खरात करत आहेत.

Web Title: Brother repeatedly stabbed right in front of his sister incident in chhatrapati sambhaji nagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime news

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.