
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. काही दिवसांपूर्वी गणेश काळे नावाच्या रिक्षाचालकाची भरदिवसा हत्या झाली होती. या खुनाचा उलगडा पोलीस करतच होते तर भरदिवसा पुन्हा एक हत्या झाली आहे. आता वाहतुकीने कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या बाजीराव रस्त्यावर अल्पाईन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तिघेही अल्पवयीन आहेत. गेल्या तीन दिवसात भरदिवसा झालेली ही दुसरी हत्या आहे.
कशी केली हत्या?
हत्या झालेल्या अल्पाईन मुलाचे नाव मयंक सोमदत्त खराडे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक आणि त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे (वय १८, रा. दांडेकर पूल) बाजीराव रस्त्यावरील टेलिफोन भवन येथून दुचाकीने महाराणा प्रताप उद्यानाकडे येत होते. त्यावेळी तीन अल्पवयीन आरोपी मास्क लावून तोंड झाकून एकाच दुचाकीवरून आले. त्यांनी मयंकच्या डोक्यावर आणि तोंडावर धारदार शास्त्राने सपासप वार करण्यास सुरवात केली. यात मयंकचा मित्र अभिजित याने मध्यस्थी केल्यास त्याच्यावर देखील कोयत्याने वार करण्यात आले आहे. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
पोलीस तपास सुरु
या हल्ल्यात मयंक हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून त्यासाठी पोलीस पथके रावण करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळीच फुटेज ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरु केला आहे.
केस छाटले, बोटही कापले
प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य असल्याचं बोललं जात आहे.याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी आहेत. त्याची चौकशी सुरु असल्याचे माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे. धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांनी मयंक खराडेचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींनी मयंक खराडेचे कोयत्याने केस छाटले होते. तसेच बोटही कापले होते. कापलेल बोट रात्यावर पडल्याचं पाहायला मिळालं.