
crime (फोटो सौजन्य: social media)
मृत्यू झालेल्या तरुणांची नावे कैलास दांडगे, रवी चंदनशिव व अंकुश पाडळे अशी आहे. हे तिन्ही तरुण २० वर्षे वयाच्या आतीलच असल्याची माहिती आहे.हे तरुण बुलढाणा तालुक्यातील ढाल सावंगी गावातील रहिवासी होते. अपघातस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
नांदुरा-बुऱ्हाणपूर मार्गावर अपघात
बुलढाणा जिल्ह्यात आणखी एक अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. नांदुरा-बुऱ्हाणपूर मार्गावर वडाप टॅक्सीचा भीषण अपघात झाला. भरधाव टॅक्सी मार्गालगत खड्ड्यात पलटी झाल्याने टॅक्सीतील दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णलयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघातानंतर नांदुरा बुऱ्हानपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चारित्र्याच्या संशयाने घेतला जीव! पतीकडून पत्नी व 4 वर्षीय चिमुकल्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या पत्नीला आणि ४ वर्षीय मुलाला संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. गाढ झोपेत असलेल्या पत्नी आणि अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. हत्या झालेल्या महिलेचे नाव राहुल म्हस्के (वय 30) आणि तिचा चार वर्षांचा मुलगा रियांश राहुल मस्के असे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव राहुल हरी मस्के (वय 35) या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
काय घडलं नेमकं?
रविवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असतांना राहुल मस्के याने पत्नी रुपाली आणि मुलगा रियांश यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. झोपेत आलेल्या दोघांच्या डोक्यावर घाव घालण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने घरातील इतर सदस्य जागे झाले. आरोपीची आई ताराबाई म्हस्के हे रुपाली झोपलेल्या खोलीत गेले. तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घरात दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आले. जखमी अवस्थेत असलेल्या रुपाली आणि मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वी रुपालीचा आणि रियांशचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मेहकर शहरात हालहाल व्यक्त केली जात आहे.
Ans: बुलढाणा–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धाड गावाजवळ एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
Ans: दुचाकीवर प्रवास करणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: नांदुरा–बुऱ्हाणपूर मार्गावर टॅक्सी खड्ड्यात पलटी होऊन 10 जण गंभीर जखमी झाले.