काय घडलं नेमकं?
रविवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असतांना राहुल मस्के याने पत्नी रुपाली आणि मुलगा रियांश यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. झोपेत आलेल्या दोघांच्या डोक्यावर घाव घालण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने घरातील इतर सदस्य जागे झाले. आरोपीची आई ताराबाई म्हस्के हे रुपाली झोपलेल्या खोलीत गेले. तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घरात दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आले. जखमी अवस्थेत असलेल्या रुपाली आणि मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वी रुपालीचा आणि रियांशचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मेहकर शहरात हालहाल व्यक्त केली जात आहे.
आरोपी पती अटकेत
मेहकर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. मृत रुपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी राहुल मस्के याला पोलिसांना ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून असा टोकाचा निर्णय घेतला गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Satara Crime : शिरवळमध्ये तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; आरोपी अटकेत, शिरवळ बंदची हाक
Ans: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात रविवारी रात्री ही घटना घडली.
Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ans: आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.






