Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: धक्कादायक! क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची चाकूने हत्या; पोलिसांनी उलगडला ‘दृश्यम’ स्टाईल प्लॅन

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे क्षुल्लक वादातून सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली. आरोपीने ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 08:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खामगावच्या सुटाळा बुद्रुक येथे क्षुल्लक वादातून भावाची हत्या.
  • आरोपीने ‘अज्ञात व्यक्तीने हल्ला केला’ असा खोटा बनाव रचला.
  • पोलिसांच्या चौकशीत आरोपी मंगेश गायकीने गुन्ह्याची कबुली दिली.
बुलढाणा: बुलढाणा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सख्ख्या लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर दृश्यम चित्रपटासारखा कट रचण्यात आला होता. पण पोलिसांनी आरोपीचा बनाव उलगडला आणि त्याला अटक केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडली.

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव देविदास महादेव गायकी असे आहे. ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देविदास आपल्या मित्रासह दारू पियुन घरी आला होता. यावेळी त्याचा लहान भाऊ मंगेश महादेव गायकी घरी होता. यावेळी देविदासच्या मित्राला लहान तू ‘घरी जा’ असे म्हटले. यावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. वादाच्या भरात देविदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारले. यामुळे संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून देविदासच्या डाव्या कुशीत आणि पोटात वार केले. या हल्ल्यात देविदास गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

त्यांनतर सुरुवातीला कोण्या अज्ञात व्यक्तीने व्यक्तीने देविदासवर वार केले, अशी खोटी माहिती आईने पोलिसांना दिली. यावेळी संशय आल्याने वडील महादेव गायकी व आरोपी मंगेश महादेव गायकी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी रात्री २ वाजता घटनास्थळाची पाहणी केली आणि घराची झडती घेतली. यावेळी मृतकाचे आई पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करत होती.

पोलिसांना आणखी संशय वाढला. शेवटी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्या आणि आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पहाटेच्या सुमारास आरोपी मंगेश गायकी याने आपला गुन्हा कबूल केला. लीला महादेव गायकी यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे ही घटना घडली.

  • Que: खून कसा झाला?

    Ans: दोन्ही भावांमध्ये वाद झाल्यानंतर लहान भाऊ मंगेशने भाजी कापण्याच्या चाकूने मोठ्या भाऊ देविदासच्या पोटात वार केले.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: आरोपीने ‘दृश्यम’ चित्रपटासारखा बनाव रचून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला, पण चौकशीत संशय आल्याने पोलिसांनी दबाव टाकताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Buldhana crime shocking younger brother stabs elder brother to death over trivial dispute police uncover visible style plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.