
अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
पोपट पिटेकर,अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या विळद घाट परिसरातील वृद्धाश्रमात पहाटेच्या सुमारास थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. मातोश्री वृद्धाश्रमात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. नेमका हल्ला कोणी आणि कोणत्या कारणातून केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.(Ahilyanagar Crime News)
अहिल्यानगरच्या विळद घाट परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात पहाटेच्या सुमारास अचानक झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञात कारणावरून झालेल्या या हल्ल्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. या प्रकरणात राजू घुले याचं नाव समोर आलं असून, त्याची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. जखमींमध्ये दत्तात्रय शंकर हाडके, मंगलेश्वर बाबुराव हिने, संतोष बिरंगळ, गणेश घोडके, भीमराज फिसके आणि गोरक्षा फुंदे यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच साहेबराव भवर आणि बाळासाहेब घाडगे यांच्याबाबतही माहिती समोर आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मातोश्री वृद्धाश्रम हा नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जात असल्याची माहिती आहे. या घटनेमागचं नेमकं कारण काय, हल्लेखोर किती होते आणि हल्ल्यात कोणत्या प्रकारच्या शस्त्रांचा वापर झाला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, दोन जणांचा मृत्यू आणि सहा जण गंभीर जखमी झाल्याने या घटनेचं गांभीर्य वाढलं आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे ताब्यात घेतले असून, हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपींला अटक केली आहे, विळद घाटातील वृद्धाश्रमात नेमकं काय घडलं? हल्ल्यामागचं कारण काय? आणि या हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार