मनोरूग्ण महिलेची हत्या (फोटो- istockphoto)
पुण्यात मनोरूग्ण महिलेची हत्या
फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला केली अटक
हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी गावात घडली घटना
पुणे: पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान पुण्यात अनैतिक संबंधाला विरोध करणार्या मनोरूग्ण महिलेच्या डोक्यात मारून तिचा खून केल्याची घटना २८ फेबु्रवारी ते ३ मार्च कालावधीत हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी गावात घडली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकीनाला, हवेली ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार अमोल मोरे (वय ४३) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, महिलेची ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावातील काची कंपनीच्या गोदामाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेच्या डोक्यात कठीण वस्तुने प्रहार केल्याचे घडकीस आले. उपचारांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता. खून झालेल्या महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. तिची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून महिलेची ओळख पटलेली नाही. हडपसर, सासवड, फुरसुंगी परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलांची पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे.
आरोपी प्रकाश माने याने तिचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी महिलेचे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
– विष्णू देशमुख, पोलीस उपनिरीक्षक
पतीच्या मदतीने पत्नीने प्रियकराला संपवले
लग्नानंतरही शरीरसंबंधासाठी दबाव टाकणाऱ्या आणि वारंवार छळ करणाऱ्या प्रियकराची महिलेने आपल्या पतीच्या मदतीने निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना खापरखेडा-कोराडी मार्गावर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नीला अटक केली आहे.
सागर रामचंद्र वानखेडे (रा. येरला) असे मृताचे नाव आहे. पोलीस तपासात समोर आले की, सागर आणि आरोपी सोनाली हे दूरचे नातेवाईक असून त्यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, सोनालीचे लग्न राजू ऊर्फ राजेश गजभिये याच्याशी झाले आणि त्यांना दोन मुलेही झाली. लग्नानंतर सागर पुण्याला राहायला गेला, तरीही तो नागपूरला आला की सोनालीवर भेटीसाठी दबाव टाकायचा. सोनालीच्या अनैतिक संबंधांची माहिती पती राजूला होती, मात्र मुलांच्या भविष्यासाठी तो तिला केवळ समजावत होता.






