crime (फोटो सौजन्य: social media )
मुंबई : मुंबईतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवर व्यावसायिकाने टॅक्सी थांबवली आणि समुद्रात उडी मारली. व्यावसायिक अमित शांतीलाल चोप्रा (47) असे मुंबईतील समुद्रात उडी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. व्यावसायिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय प्राथमिक तपासातून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अमित चोप्रा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, पोलिसांना त्यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडली नाही, त्यामुळे कुटुंबीयांकडे चौकशी केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
नागपूर हादरलं! ११ वर्षीय मुलाची अपहरण करून निर्घृण हत्या, खंडणीसाठी शेजाऱ्यानेच रचला कट
आत्महत्या करणारे व्यावसायिक अमित शांतीलाल चोप्रा (47) हे मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहे. त्यांचे सर्व नातेवाईक तेथेच वास्तव्याला आहेत. मात्र चोप्रा हे पत्नी व मुलांसोबत मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे वास्तव्याला होते. तसेच, मुंबईतच इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करीत होते, त्यामुळे ते मुंबईतच वास्तव्यास होते.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास चोप्रा यांनी टॅक्सी पकडली होती. टॅक्सी वांद्रे मार्गे सीलिंकवर आल्यानंतर आपल्याला साप चावला, असा आरडाओरडा त्यांनी धावत्या टॅक्सीतूनच केला. त्यामुळे, घाबरलेल्या टॅक्सीचालकाने टॅक्सी बाजूला थांबवली. त्यानंतर, चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि सी-लिंकवरून थेट समुद्रात उडी मारली. याप्रकारामुळे टॅक्सी चालक घाबरला व त्याने तात्काळ हा प्रकार सीलिंक कर्मचारी व पोलिसांना सांगितला. त्यानंतर, पोलिसांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत व्यवसायिक चोप्रा यांचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढल्याची माहिती आहे.
धक्कादायक! महिला कर्मचाऱ्याकडून 4 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी महिला अटकेत
दरम्यान मुंबईत आता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एक नामांकित शाळेमध्ये महिला कर्मचाऱ्याकडून ४ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीची आजी शाळेतून घरी घेऊन गेल्यावर घरात मुलीचे कपडे बदलताना तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. यानंतर आजीने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. गोरेगाव पोलिसांनी आजीच्या तक्रारीवरून शाळेतील एका महिला कर्मचाऱ्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्या महिलेला अटक केली आहे.
अटक केलेली महिला ही किती दिवसांपासून या मुलीचा विनयभंग आणि टॉर्चर केले जात होते याचा तपास पोलीस करत आहे. या संदर्भात गोरेगाव पोलीस शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरा तब्यत घेतले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या संरक्षणाची बाब ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी