crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुण्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुण्यातील कोथरूड भागात मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mumbai crime: धक्कादायक! महिला कर्मचाऱ्याकडून 4 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी महिला अटकेत
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसून तो रात्री मित्रांसोबत उभा होता. दुचाकीला साईड न दिल्यामुळे तिथे वाद झाला. त्यानंतर टोळीतील मयूर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला. यापैकी मयूर कुंभारेने थेट गोळीबार केला असून त्याने तीन गोळ्या झाडल्या. यात धुमाकुळच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मयुर कुंभारे आणि आनंद चांडलेकर या आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.
मला तू रस्ता का देत नाही म्हणत गोळीबार
जखमीचे नाव प्रकाश धुमाळ असे आहे. निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात प्रकाश धुमाळ हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. गोळ्या लागल्यानंतर तो तशाच अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्या ठिकाणी रक्ताचे आणि पायाचे ठसे दिसून येत आहेत.कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहीत आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय आहे. मयुर कुंभारे आणि आनंद चांडलेकर या आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. इतर आरोपी फरार आहेत. मयुर कुंभारेने हा गोळीबार केला आहे. प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपींपैकी मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्यात. यामध्ये प्रकाश धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला, परिसरात त्यांचं रक्त पडल्याचं दिसून आलं. प्रकाश धुमाळ यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो रात्री मित्रांसोबत उभा होता तेव्हा दुचाकीला रस्ता दिला नाही या क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
स्थानिकांनी काय दिली माहिती
प्रकाश धुमाळ पळून जाताना त्यांच्या अंगावरून रक्त वाहत होतं. या घटनेबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सकाळी पाहिलं तेव्हा इथे खाली रक्त सांडलं होतं, जो कोणी व्यक्ती होता त्याला खूप लागलं होतं. तो इकडून पळून गेला होता. रात्री आमच्याकडे टीव्ही चालू असल्यामुळे आवाज आला नाही. त्यामुळे बाकी काही माहिती नाही.
शुल्लक कारणावरून गोळीबार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे तो आपल्या मित्रांसोबत बोलत उभा होता रस्ता दिला नाही. इतक्या शुल्लक करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
नागपूर हादरलं! ११ वर्षीय मुलाची अपहरण करून निर्घृण हत्या, खंडणीसाठी शेजाऱ्यानेच रचला कट