crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शाळकरी मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव जितू युवराज सोनेकर (वय 11) असे आहे. जितू हा खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. शाळेतून सुट्टी झाल्यानंतर आरोपींनी अपहरण करून त्याची हत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
बेदम मारहाण करून भावाची हत्या; आईसह वहिणीचीही होती साथ, शवविच्छेदन अहवाल आला अन्…
नेमकं काय घडलं?
जितू हा १५ सप्टेंबर रोजी शाळेसाठी घरून गेला होता. तो शाळेत गेला देखील परंतु सुट्टी झाल्यानंतर तो घरी परातलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शाळेत धाव घेत विचारपूस केली त्याच्या मित्रांना विचारले तेव्हा समोर आले की जितूला एका कारमध्ये बसल्याचे पाहिल्याचं सांगितली. त्यांनतर, कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी शोध घेतला तरीही जितूची थांगपत्ता लागलाच नाही.
अखेर काल चनकापूर येथील येथील डब्ल्यूसीएल कॉलनीलगतच्या शिवारात गुराख्याला लहान मुलांचा शाळेच्या गणवेश घातलेला मृतदेह झुडपात दिसून आला आहे. त्यांनतर, या गुराख्याने पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यामुळे, पोलिसांनी घटनेचा तपास करत काही तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी अपहरण करून निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही नराधमास अटक केली आहे. आरोपी हे मृतकाच्या शेजारी राहणारे आहेत. आरोपींना खंडणीसाठी या चिमुकल्या शाळकरी मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे.
जितूने विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली म्हणून
जितूचे वडील यांना शेत विकल्याचे पैसे मिळणार असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या आरोपीला होती. त्यामुळे आरोपी राहुल पाल, अरुण भारती आणि यश वर्मा (तिघेही रा. चनकापूर) यांनी पैसे कमावण्याच्या हेतूने जितूच्या अपहरणाचा कट रचला होता. जितूचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडे खंडणी मागण्याच्या तयारीत आरोपी होते. मात्र, अपहरण केल्यानंतर जितूने विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने चिमुकल्या मुलाची गळा आवळून हत्या केली. त्यांनतर, दोन दिवस त्याचा मृतदेह लपवून ठेवत प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कसून तपास सुरु केल्यानंतर अखेर आरोपीचे बिंग फुटले. केवळ पैशाच्या लोभापायी तिघांनी ११ वर्षीय मुलाचा जीव घेतल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
Mumbai crime: धक्कादायक! महिला कर्मचाऱ्याकडून 4 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी महिला अटकेत