Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिवंडीत व्यावसायिकाची हत्या, चार दिवस बेपत्ता, जंगलात सापडला मृतदेह; खंडणीसाठी व्हॉट्सऍपवरून मागणी

भिवंडीतील बेपत्ता असलेले पॉवरलूम व्यावसायिक फरहत अखलाक शेख (वय 54) यांची हत्या झाल्याचा समोर आलं आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेख यांचा मृतदेह भिवंडीतील कारवली गावाजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2025 | 08:46 AM
crime (फोटो सौजन्य- pinterest)

crime (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

भिवंडीतील बेपत्ता असलेले पॉवरलूम व्यावसायिक फरहत अखलाक शेख (वय 54) यांची हत्या झाल्याचा समोर आलं आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेख यांचा मृतदेह भिवंडीतील कारवली गावाजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला. आरोपीने शेख यांच्या व्हॅट्सऍपवरून कुटुंबियांकडून तीन लाखांची खंडणीही मागितल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरु आहे.

७० वर्षीय प्रियकर आणि ५० वर्षीय प्रेयसीला अटक, GRPने पकडताच जे कळालं ते ऐकून धक्का बसेल…

नेमकं काय प्रकरण?

भिवंडीतील शहरातील गैबी नगर परिसरात राहणाऱ्या पावरलूम व्यवसायिक फरहत अखलाक शेख हे १२ एप्रिलला घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेतला. अनेकदा त्यांनी कॉल केला मात्र मोबाईल स्विच ऑफ येत होता. म्हणून कुटुंबीयांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मिसिंग रिपोर्ट दाखल केली. पोलिसांनी तपास घेत असतानाच कुटुंबीयांना शेखच्या व्हाट्सअपवरुन एक मेसेज आला. त्यात तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

 कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

शनिवारी सकाळपासून बेपत्ता असलेला फरहत शेख यांचा मृतदेह भिवंडी पोलिसांनी कारिवली गावच्या जंगलात सापडून आला. हा मृतदेह चार दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी भोईवाडा पोलीस दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला .

सीसीटीव्ही फुटेज हाती
फरहत शेख हे आपल्या स्कूटरवरुन एका पिवळा शर्ट घातलेल्या तरुणासोबत कारिवली गावाच्या दिशेने गेले होते असं पोलिस तपासामध्ये समोर आलं. त्याचा सीसीटीव्हीही पोलिसांच्या हाती लागला.

व्हॉट्सअ‍ॅपवरून मॅसेज

फरहत शेख यांचे मोबाईल सिम दुसऱ्या फोनमध्ये टाकून व्हॉट्सअ‍ॅपवरून मॅसेज केले जात होते. त्याचा अपघात झाल्याचे सुरवातीला सांगितले गेले. परंतु नंतर ८० हजार रुपयांची मागणी झाली. ही रक्कम वाढत गेली तीन लाखांपर्यंत. सर्व चर्चा हे मॅसेजद्वारा करण्यात आली. पैशाची मागणी देखील मॅसेज स्वरूपात झाली. आधी पोलिसांना पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातील झोपडपट्टीत तो मोबाईल वापरला जात असल्याचा सुगावा लागला. पोलीस तिथे पोहोचले होते, मात्र आरोपी सतत लोकेशन बदलत होते आणि पोलिसांना चकवा देत होते. चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर फरहत शेख यांचा मृतदेह कारिवली गावच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला.

आरोपीचा तपस सुरु
फरहत शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील आजमगढ़ येथील रहिवासी असून ते भिवंडीतील गैबीनगर परिसरात पत्नी व चार मुलींसह राहत होते. ते पॉवरलूम व्यवसाय आणि बिल्डरचे काम करायचे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून आरोपीचा कसून शोध करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Businessman murdered in bhiwandi missing for four days body found in forest demand for ransom on whatsapp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Kidnapping news
  • Mumbai

संबंधित बातम्या

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत
1

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

लुसिरा ज्वेलरीचे मुंबईत पहिले स्टोअर सुरू! केवळ विक्री केंद्र नव्हे तर सामुदायिक अनुभव केंद्र
2

लुसिरा ज्वेलरीचे मुंबईत पहिले स्टोअर सुरू! केवळ विक्री केंद्र नव्हे तर सामुदायिक अनुभव केंद्र

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या
3

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

अभिनेत्री अलंकृता सहायचे मुंबईत पुनरागमन; अनेक दमदार प्रोजेक्ट्ससह करणार नव्या अध्यायाची सुरूवात
4

अभिनेत्री अलंकृता सहायचे मुंबईत पुनरागमन; अनेक दमदार प्रोजेक्ट्ससह करणार नव्या अध्यायाची सुरूवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.