
Accident News: कार दोन ट्रकमध्ये अडकली अन्...; मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
दोन ट्रकच्या मध्ये कार येऊन तिहेरी अपघात
गुजरातहून मुंबईकडे मार्गावर अपघात
डहाणू: डहाणूमध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. डहाणू येथील महालक्षी येथे तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकच्या मध्यभागी एक कार येऊन तिहेरी अपघात घडला आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे.
गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर महालक्ष्मी येथील उड्डाण पुलावर अपघात घडला आहे. या घटनेत कारचा चक्काचुर झाला आहे. कार दोन्ही बाजूने दोन ट्रकच्या मध्ये दाबली गेली. या घटनेत कारमधील चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना कासा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. त्या ठिकाणी जखमी लोकांवर उपचार केले जात आहेत.
17 व्या मजल्यावरून क्रेन मजुरांवर कोसळली
कल्याण शहरात इमारत बांधकामाच्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमधील विकास डेव्हलपर्सच्या ‘रिट्स’ इमारतीच्या सतराव्या मजल्यावर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतराव्या मजल्यावर क्रेनच्या सहाय्याने बांधकाम साहित्य चढवले जात असताना अचानक तोल जाऊन क्रेन मजुरांच्या अंगावर कोसळली. या अपघातात अमा हुल्ला (वय 22 वर्षे) या तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर कौसर अलाम (वय 23 वर्षे) हा मजूर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मृत मजुराचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे.
स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताचा पंचनामा नोंदवला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मृत मजुराच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कामगार योग्य संरक्षक उपकरणे न पुरवून धोकादायक काम करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत कामगाराला न्याय मिळावा यासाठी त्यांनी पोलिसांकडे तक्रार लिहून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.