अपघातानंतर जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय मनोर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढून माणुसकीचा आदर्श दाखवला अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली होती.या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून सुमारे दोन ते अडीच तासांत वाहतूक सुरळीत केली.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे:
यशवंत मोरेश्वर मात्रे (४५), जमनाभाई पाटील (५५), भगवान पाटील (६९), धनवंती पाटील (४०), मीना पाटील (५०), लावण्या लोखंडे (१४), मोतीराम फडके (५२), गीता मळवी (४५), जानुबाई पाटील (७५) यांच्यासह इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान सातीवली उडान पुलाचे अलीकडेच नवीनीकरण झाल्यानंतर या मार्गावर वाहनांची गती मोठ्या प्रमाणात वाढली असून वेगावर कोणतेही ठोस नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी वेगमर्यादा फलक, गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे व नियमित पोलिस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाने वेळीच गती नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील वाहनचालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Ans: पुढे उभ्या असलेल्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्यानंतर त्याच कंटेनरला बस आदळली आणि चालकाचे नियंत्रण सुटले.
Ans: बसमधील ३५ प्रवाशांपैकी १४ प्रवासी अति व किरकोळ जखमी झाले.
Ans: वेगमर्यादा फलक, सीसीटीव्ही कॅमेरे, गतिरोधक आणि नियमित पोलिस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.






