Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

जिल्हा परिषदेचे शिक्षक संभाजी कडीले यानी पैठण तालुक्यातील नानेगाव पूसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार हा दोन दिवसांपूर्वीच स्विकारला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 05, 2025 | 08:06 AM
देवदर्शन करून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; कार दरीत कोसळली अन्...

देवदर्शन करून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; कार दरीत कोसळली अन्...

Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : पैठण येथील छत्रपती पंपाजवळ कार आणि दुचाकीचा शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या झालेल्या अपघातात पैठण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे (वय ५२) आणि सहशिक्षक संभाजी कर्डीले (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच १७ एझेड १०४५) शशिविहारकडे वळण घेत असलेल्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारने दुचाकीस्वारांना तब्बल ५०-६० फूट फरफटत नेले. कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. गंभीर जखमींना महेंद्र साळवे, स्वप्नील साळवे व फिरोज खान यांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने पैठण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, संत एकनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन सचिन घायाळ, नगरसेवक भूषण कावसनकर, गणेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर घटनास्थळी दाखल झाले.

शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार

शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर भाऊसाहेब पिसे यांच्यावर आवडे उंचेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव गोमारे वाच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलिस करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वीच मुख्याध्यापकपदाचा पदभार

जिल्हा परिषदेचे शिक्षक संभाजी कडीले यानी पैठण तालुक्यातील नानेगाव पूसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार हा दोन दिवसांपूर्वीच स्विकारला होता. त्यांची पत्नीही जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तर मुलगा वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे.

पिसे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

पैठण नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब पिसे यांच्या वडिलांचे निधन अवघ्या १५ दिवसांपूर्वीच झाले होते. या दुःखातून सावरत असतानाच आता विसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Car bike accident in sambhajinagar former deputy mayor and teacher die in accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 08:06 AM

Topics:  

  • Accident News
  • Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Odisha stone quarry explosion : ओडिसामध्ये परवानगीशिवाय सुरु होती दगड खाण; भीषण स्फोट झाल्याने कामगार जमिनीखाली..
1

Odisha stone quarry explosion : ओडिसामध्ये परवानगीशिवाय सुरु होती दगड खाण; भीषण स्फोट झाल्याने कामगार जमिनीखाली..

मॉर्निंग वॉकचा ‘तो’ दिवस ठरला अखेरचा; ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
2

मॉर्निंग वॉकचा ‘तो’ दिवस ठरला अखेरचा; ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको
3

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको

Chh Sambhajinagar: ITI नंतरही अल्पमुदतीचे अभ्यासक्रम; ‘दुहेरी प्रशिक्षण’ वाढल्याची चिंता
4

Chh Sambhajinagar: ITI नंतरही अल्पमुदतीचे अभ्यासक्रम; ‘दुहेरी प्रशिक्षण’ वाढल्याची चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.