Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीच्या अपघातात सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

कौशिक आणि ऋषिता हे दोघे रविवारी सोमाटणे फाटा येथील घोरवडेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री नऊ वाजताच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी परतत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 13, 2026 | 11:44 AM
दुचाकीच्या अपघातात सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

दुचाकीच्या अपघातात सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पिंपरी : देवदर्शनावरून परत येताना भावा-बहिणीच्या दुचाकीला पाठीमागून वेगात येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील भाऊ आणि बहिणीचा मृत्यू झाला. ही घटना जुना पुणे-मुंबई महामार्गावर हॉटेल पुना गेट समोर घडली. कौशिक रवी मुल्या (वय २१), ऋषिता रवी मुल्या (वय १७, भोसरी) अशी मृत्यू झालेल्या भाऊ बहिणीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक आणि ऋषिता हे दोघे रविवारी सोमाटणे फाटा येथील घोरवडेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री नऊ वाजताच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी परतत होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने येत असताना पुना गेट हॉटेल जवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून वेगात आलेल्या दुचाकीने (एमएच १४ एनसी ०९७४) धडक दिली. या अपघातात कौशिक आणि ऋषिता हे दोघेही गंभीर जखमी झाले.

Devendra Fadnavis : ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

दोघांना तात्काळ उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी रात्री उशिरा कौशिक याचा तर सोमवारी ऋषिता हिचा मृत्यू झाला. आकुर्डी येथील खासगी कॉलेजमध्ये कौशिक हा दुसऱ्या वर्षाला तर ऋषिता ही अकरावी इयत्तेत शिकत होते.

देहूरोड पोलिसांनी आरोपीची दुचाकी जप्त केली आहे. या भीषण अपघातात आरोपी देखील जखमी झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये चौकशी करून त्याचा शोध घेतला जात आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत. भोसरी येथील प्रसिद्ध टेलर व्यावसायिक रवी मुल्या यांची ही मुले होती. सख्ख्या भावंडांचा अपघाती बळी गेल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

म्हसवड-शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार

 माण तालुक्यातील म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक (राजेमाने यांचा मळा) येथे दोन इर्टिका कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारमधील सहा प्रवासी जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त इर्टिका कारपैकी एक कार वरकुटे-म्हसवड येथील बनवस्तीवरील, तर दुसरी कार पिलीव (ता. माळशिरस) येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Siblings die in two wheeler accident incident in pimpri nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Pimpri News

संबंधित बातम्या

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…
1

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
2

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?
3

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?

Pune Murder : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून
4

Pune Murder : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.