Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: वारजे दुर्घटनेप्रकरणी चाळ मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; वडील,मुलाचा झाला होता मृत्यू

दरम्यान ९ एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुडावत राहत असलेल्या पत्र्याच्या खोलीत शाॅर्टसर्किट झाले. प्रकाश डिलिव्हरी बॉयचुरे काम करत असल्याने तो  रात्रपाळीत कामाला गेला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 12, 2025 | 02:35 AM
Pune News: वारजे दुर्घटनेप्रकरणी चाळ मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; वडील,मुलाचा झाला होता मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:
पुणे: वारजे परिसरात घरात गॅस सिलेंडरच्या स्फोट होऊन झालेल्या बाप-लेकाच्या मृत्यूप्रकरणात चाळ मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला असून, आग शॉर्ट सर्किट यामुळे लागल्याचे समोर आले आहे. आग लागल्यानंतर घरघुती गॅसचा स्फोट झाला.
याप्रकरणी नितीन नारायण बराटे (वय ४२, रा. हर्षवर्धन बिल्डींग, वारजे गावठाण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश मोहन मुडावत (वय २४, रा. नितीन बराटे चाळ, गोकुळनगर, वारजे माळवाडी ) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वारजे भागातील गोकुळनगर परिसरात नितीन बराटे याची चाळ आहे. चाळीतील पत्र्याच्या खोलीत प्रकाश मुडावत, त्याचे वडील मोहन आणि मोठा भाऊ पप्पू हे राहायला आहेत. वर्षभरापूर्वी प्रकाशच्या आईचे निधन झाले होते. प्रकाश, माेहन, पप्पू हे मजुरी करुन उदरनिर्वाह करत होते. दरम्यान ही चाळ मोठी आहे. मात्र मुडावत राहत असलेल्या लाईनला पत्र्याच्या ६ खोल्या होत्या.

दरम्यान ९ एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुडावत राहत असलेल्या पत्र्याच्या खोलीत शाॅर्टसर्किट झाले. प्रकाश डिलिव्हरी बॉयचुरे काम करत असल्याने तो  रात्रपाळीत कामाला गेला होता. शाॅर्टसर्किट झाल्यानंतर खोलीत आग लागली. आग लागल्यानंतर त्यांना बाहेर पडता आले नाही. ते बाथरूममध्ये जाऊन लपटले. पण, आगीत सिलिंडरने पेट घेतला आणि त्याचा स्फोट झाला. यात प्रकाशचे वडील मोहन आणि भाऊ पप्पू गंभीर होरपळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पुण्यातील वारजेत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; संपूर्ण घर जळून खाक, दोघांचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने पाहणी केली. तेव्हा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचे उघडकीस आले. पत्र्याच्या खोलीत खिडकी नव्हती, तसेच बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा होता. पुरेशी काळजी न घेतल्याने दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चाळ मालक नितीन बराटेवर सदोष मनुष्यवधाचा गु्न्हा दाखल केला. सहायक निरीक्षक रणजीत मोहिते तपास करत आहेत.

Web Title: Case culpable homicide registered against owner of chawl connection horrific gas cylinder explosion warje pune crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Cylinder Blast
  • Pune
  • pune news
  • Warje

संबंधित बातम्या

पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट
1

पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

Pune Crime: आंदेकर टोळीचा नामोनिशान मिटवायला सुरुवात! कडक बंदोबस्तात कारवाई
2

Pune Crime: आंदेकर टोळीचा नामोनिशान मिटवायला सुरुवात! कडक बंदोबस्तात कारवाई

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनाची पाहणी सुरू
3

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनाची पाहणी सुरू

Parth Pawar Land Scam : १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी…! पार्थ पवार यांची कंपनी आणि शितल तेजवाणी यांना क्लिन चीट
4

Parth Pawar Land Scam : १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी…! पार्थ पवार यांची कंपनी आणि शितल तेजवाणी यांना क्लिन चीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.