Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरेगाव भिमातील ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल; नेमकं प्रकरण काय?

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका व्यावसायिकाने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2024 | 04:18 PM
गारगोटीत भर दिवसा दरोडा; 5 तोळे सोन्यासह रोकड लंपास

गारगोटीत भर दिवसा दरोडा; 5 तोळे सोन्यासह रोकड लंपास

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका व्यावसायिकाने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत महेश सुरेश कुलकर्णी (वय ४४ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी 11 जणांवर गुन्हे दाखल केले याहेत.

नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे (तिघे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर) सुधाकर कांतीलाल ढेरंगे, कांतीलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) शांताराम सावंत (रा. वाडागाव ता. शिरुर) अजय यादव, जनार्धन वाळूंज (रा. लोणीकंद ता. हवेली) जातेगाव खुर्दचे माजी सरपंच किशोर खळदकर (रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर), मामा सातव (रा. वाघोली ता. हवेली) या अकरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील किराणा व्यावसायिक किरण कुलकर्णी हे वैष्णवी सुपर मार्केट नावाने व्यवसाय करत होते. कोरोना काळामध्ये व्यवसाय अडचणीत आल्यानंतर किरण यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. किरण यांनी गावातील सुधाकर ढेरंगे व कांतीलाल ढेरंगे यांच्या सोबत भागीदारीमध्ये इमारत बांधली होती. बरेच दिवस खासगी सावकारांना व्याज दिल्याने किरण अडचणीत आले होते. त्यांनी ढेरंगे यांच्या सोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळा विक्रीचा निर्णय घेतला. मात्र त्या खरेदीसाठी व्यक्ती आल्यास ढेरंगे त्यांना ती इमारत घेऊ देत नव्हता. तसेच झालेले व्यवहार मोडत होते. मात्र ज्या खासगी सावकारांकडून किरण यांनी पैसे घेतले ते सर्वजन त्यांना मानसिक त्रास देत दमदाटी करत होते.

भिमा नदीच्या पाण्यात संपविले जीवन

सावकार आणि ढेरंगे यांच्या त्रासाला कंटाळून किरण कुलकर्णी यांनी भिमा नदीच्या पाण्यात आत्महत्या केली. या घटनेबाबत महेश कुलकर्णी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.

Web Title: Case registered against 11 people in case of that suicide in koregaon bhima nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2024 | 04:18 PM

Topics:  

  • Koregaon Bhima
  • maharashtra

संबंधित बातम्या

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
1

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

जूनमध्ये बंपर GST कलेक्शन, आकडा 1.94 लाख कोटींवर; महाराष्ट्र पुन्हा अव्वल स्थानी, आता वस्तू स्वस्त होतील की  महागाई वाढेल?
2

जूनमध्ये बंपर GST कलेक्शन, आकडा 1.94 लाख कोटींवर; महाराष्ट्र पुन्हा अव्वल स्थानी, आता वस्तू स्वस्त होतील की महागाई वाढेल?

लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ
3

लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ

पंढरपूरच्या विकास आराखड्याला वेग! निविदा प्रक्रिया राबवा; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासाठी वास्तुविशारद नेमा
4

पंढरपूरच्या विकास आराखड्याला वेग! निविदा प्रक्रिया राबवा; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासाठी वास्तुविशारद नेमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.