Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘माहेरहून 80 लाख आण’, पैशांसाठी पत्नीवर जीवघेणा हल्ला; छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाला अटक

छत्रपती संभाजीनगरातील एन-3 परिसरात एका व्यावसायिकाने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. 80 लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला जात होता. पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी अमित बोरसे याला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 07, 2026 | 02:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीवर संशय घेत पतीकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ.
  • 80 लाख रुपये आणण्यासाठी पत्नीवर दबाव आणि मारहाण केल्याचा आरोप.
  • मध्यरात्री गळा दाबून हत्येचा प्रयत्न; आरोपी पतीला अटक.
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाने पत्नीचा गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आला आहे. ही धक्कादायक घटना 5 जूनच्या मध्यरात्री एन-3 परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीत घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी अमित विनायक बोरसे या व्यावसायिकाला अटक केली असून न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित ४० वर्षीय महिलेचा विवाह २०१० मध्ये जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या अमित बोरसे याच्याशी झाला होता. वैवाहिक आयुष्यात सातत्याने वाद होत असल्याने संबंधित महिला २०२२ मध्ये माहेरी राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या मध्यस्थी झाल्याने ती पुन्हा सासरी परतली. मात्र त्यानंतर पत्नीवर संशय घेणे, तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वाहनांमध्ये जीपीएस बसवणे तसेच नोकरी करण्यास विरोध करणे, असे प्रकार सुरू असल्याचे तिने तक्रारीत आरोप केले आहे.

६ हजारांची नोकरी अन् घरात दडवलं होतं कोट्यवधींचं ‘काळं साम्राज्य’; ओडिशातील इंजिनिअरच्या मालमत्तेने उडवली सर्वांची झोप

८० लाख रुपयांची माहिती

व्यवसायात आर्थिक अडचणी निर्माण झाल्यानंतर अमित बोरसे यांनी वडिलांचे घर तारण ठेवून कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पत्नीने माहेरकडून ८० लाख रुपये आणावेत, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. याच कारणावरून वारंवार मारहाण देखील केल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

वाढदिवसानंतर मारहाण आणि…

५ जून रोजी मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मध्यरात्री केक कापल्यानंतर कुटुंबीय घरातच होते. त्यावेळी संबंधित महिला हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असताना अमित बोरसे यांनी तिच्यावर अचानक हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने कसाबसा प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेत शेजाऱ्यांच्या घरात आश्रय घेतला.

हा हल्ला महिलेच्या चेहऱ्यावर, डाव्या कानाला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या जखमांमुळे तिच्या दृष्टी आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक केली.

पिस्तूल पत्नीच्या कपाळावर रोखली…

काही दिवसांपूर्वी अमित बोरसे यांनी वडिलांकडे असलेले परवानाधारक पिस्तूल पत्नीच्या कपाळावर रोखून तिला घटस्फोट देण्याची धमकी दिली होती. घटस्फोटास नकार दिल्यास त्याच पिस्तूलाने ठार मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. कुटुंबाची बदनामी होऊ नये या भीतीने महिलेने याबाबत यापूर्वी कुठेही तक्रार केली नव्हती. या प्रकरणाचा पुढील तपास पुंडलिकनगर पोलीस करत आहेत.

पाटस पोलिस ॲक्शन मोडवर; गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगरातील एन-3 परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीत घडली.

  • Que: पत्नीवर कोणत्या कारणासाठी दबाव टाकला जात होता?

    Ans: माहेरहून 80 लाख रुपये आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला जात होता.

  • Que: पोलिसांनी आरोपीविरुद्ध काय कारवाई केली?

    Ans: पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी अमित विनायक बोरसे याला अटक करून न्यायालयात हजर केले.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime businessman arrested in chhatrapati sambhajinagar for a life threatening attack on his wife over a demand to bring 80 lakh from her maternal home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
1

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
3

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
4

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.