Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Pregnant Woman Abuse: लग्नाला काही महिने होत नाही तोच ५ लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा अमानुष छळ! गर्भवती असताना उपचारांअभावी झालेला गर्भपात अन् तीव्र त्रासाने आलेला 'ब्रेन स्ट्रोक'... सुशिक्षित शिक्षक पतीने सासरच्यांसोबत मिळून रचलेल्या या भयानक क्रूरतेचा पर्दाफाश कसा झाला? पहा संपूर्ण घटनाक्रम...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 23, 2026 | 01:42 PM
Pregnant Woman Abuse: "पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!" सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Pregnant Woman Abuse: "पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!" सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Follow Us
Follow Us:
  • ५ लाख रुपये आणि सोन्याच्या साखळीसाठी विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ.
  • शिक्षक पती, सासू-सासरे, नणंद आणि दिराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
  • जास्त वजन असल्याचे कारण देत जाणीवपूर्वक कमी अन्न देऊन केले हाल. 

Pregnant Woman Abuse: विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला, पण लग्नाला काही महिने होत नाहीत तोच हुंड्याची हाव अन् अमानुष छळाची परिसीमा गाठल्याची अत्यंत भीषण घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. चारचाकी वाहनासाठी माहेरून ५ लाख रुपये आणण्याचा तगादा, सोन्याच्या साखळीवरून टोमणे आणि अमानुष मारहाणीमुळे अवघ्या २५ वर्षीय विवाहितेला गर्भपात व ‘ब्रेन स्ट्रोक’ सारख्या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात शिक्षक असलेल्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थाटात लग्न पार पडले, अन् ५ दिवसांतच सुरू झाला छळ

छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी येथील एका लॉनमध्ये ५ एप्रिल २०२६ रोजी पीडित तरुणीचा विवाह नंदनवन कॉलनीतील सुमित अशोक मगरे (वय ३२, व्यवसाय शिक्षक, शिक्षण M.Sc., B.Ed.) याच्याशी झाला होता. दोन्ही बाजूंच्या संमतीने विवाह मोठ्या उत्साहात पार पडला, मात्र लग्नानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली.

लग्नात मुलीच्या वडिलांनी नवरदेवाला सोन्याची साखळी (चैन) दिली नाही, यावरून सासू विजया मगरे, सासरे अशोक मगरे, नणंद अश्विनी बनसोडे आणि मोठा दीर प्रशांत मगरे यांनी विवाहितेला टोमणे मारत मानसिक त्रास देणे सुरू केले. मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून वडिलांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जावयाच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली, तरीही सासरच्यांची पैशांची भूक शमली नाही.

हेही वाचा: Student Suicide Case: बुधवारच्या त्या दुपारी नेमके काय घडले? शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून ७ व्या वर्गातील विद्यार्थ्याने… 

माहेरून ५ लाख आणा, नाहीतर दुसरे लग्न करू! मारहाणीचा थरार 

१४ जून २०२६ रोजी विवाहितेला शिवीगाळ करत “चारचाकी घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये” अशी मागणी करण्यात आली. “दिलेली सोन्याची साखळी अपुरी आहे, पैसे आणले नाहीत तर सुमितचे दुसरे लग्न लावून देऊ,” अशी धमकी देत सासू, नणंद व दिराने पीडितेला बेदम मारहाण केली आणि तिचे केस पकडून जमिनीवर पाडले. एवढेच नव्हे तर तिचे वजन जास्त असल्याचे कारण पुढे करत तिच्याकडून फरशी पुसणे, झाडलोट आणि दगडावर कपडे धुणे अशी कष्टाची कामे जबरदस्तीने करून घेतली जात होती. तिला जाणीवपूर्वक अपुरे जेवण देऊन तिची उपासमार केली जात असल्याचेही फिर्यादीत उघड झाले आहे.

गर्भवती असताना उपचारास नकार; गर्भपात अन् ब्रेन स्ट्रोक!

सततच्या मारहाणीमुळे आणि त्रासामुळे विवाहितेची प्रकृती कमालीची खालावली. ती गर्भवती राहिल्यानंतरही सासरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेण्यास वा सोनोग्राफी करण्यास जाणीवपूर्वक नकार दिला. या अमानुष त्रासामुळे २३ ऑगस्ट २०२६ रोजी तिचा दुर्दैवी गर्भपात झाला. प्रकृती अत्यंत बिघडल्याने तिला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केली असता तीव्र मानसिक व शारीरिक आघातामुळे तिला ‘ब्रेन स्ट्रोक’ आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. वेळेत गर्भपात केला नसता तर तिच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला असता, असा अहवाल डॉक्टरांनी दिला.

हेही वाचा: Facebook King Murder:’फेसबुक किंग’चा रक्तरंजित अंत! जिमवरून परतताना रील्स पार्टनरनेच भररस्त्यात कारने उडवून केला खून

पतीसह ५ जणांवर छावणी पोलिसांत गुन्हा दाखल

या प्राणघातक घटनेनंतरही सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा नांदवून घेण्यास ठाम नकार दिला अन् तिच्या माहेरच्यांनाही शिवीगाळ केली. अखेर पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी पती सुमित मगरे याच्यासह पाचही नातेवाइकांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली आहे आणि गुन्हा कुठे दाखल झाला?

    Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील नंदनवन कॉलनी येथे घडली असून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: आरोपींवर मुख्य आरोप काय आहेत?

    Ans: ५ लाखांचा हुंडा, सोन्याची साखळी यांसाठी अमानुष मारहाण करणे, उपासमार करणे आणि त्रासामुळे गर्भपात व ब्रेन स्ट्रोक होणे हे मुख्य आरोप आहेत.

  • Que: पोलिसांत कोणाकोणावर गुन्हा नोंदवला गेला आहे?

    Ans: पती सुमित मगरे, सासू विजया मगरे, सासरे अशोक मगरे, नणंद अश्विनी बनसोडे आणि दीर प्रशांत मगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar pregnant woman dowry abuse case news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Abused Case
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Crime . Crime News
  • Teacher

संबंधित बातम्या

Facebook King Murder:’फेसबुक किंग’चा रक्तरंजित अंत! जिमवरून परतताना रील्स पार्टनरनेच भररस्त्यात कारने उडवून केला खून
1

Facebook King Murder:’फेसबुक किंग’चा रक्तरंजित अंत! जिमवरून परतताना रील्स पार्टनरनेच भररस्त्यात कारने उडवून केला खून

Maharashtra MLC Election 2026: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2

Maharashtra MLC Election 2026: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

चहाविक्रेत्या दाम्पत्याचा अंत अन् अडीच वर्षांची चिमुकली गूढरीत्या गायब; या भयानक कृत्यामागचे रहस्य काय?
3

चहाविक्रेत्या दाम्पत्याचा अंत अन् अडीच वर्षांची चिमुकली गूढरीत्या गायब; या भयानक कृत्यामागचे रहस्य काय?

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती
4

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.