
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
समोर आलेल्या माहितीनुसार, इम्तियाज अली हा बऱ्याच काळापासून नारायणपूर जिल्ह्यातील धौराई परिसरात राहत होता. नक्षलवाद्यांनी प्रथम जेसीबी मशीनच्या दिवाणजीचे अपहरण केले. अपहरणाची बातमी मिळताच कंत्राटदार इम्तियाज अली घटनास्थळी पोहोचला. दिवाणजीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पकडण्यात आले. नक्षलवाद्यांनी त्याचा गळा चिरून वाटेतच त्याची हत्या केली. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी जेसीबी मशीनच्या दिवाणजीला सोडून दिले.
त्यांनतर दिवाणजीने कंत्राटदाराच्या कुटुंबाला याची माहिती दिली. कुटुंबाने पामेड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पामेड पोलिसांचे पथक हत्येच्या ठिकाणी रवाना झाले असून परिसरात शोध मोहीम सुरु आहे. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी लिपिकाला सोडून दिले, ज्याने संपूर्ण घटना पोलिसांना आणि कुटुंबाला सांगितली.
पोलिसांनी दिवाणजींच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी घटनेचे संभाव्य ठिकाण ओळखले आहे. रस्ते बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध दर्शविला होता म्हणून हे कृत्य करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या लैंगिक आणि मानसिक छळाला कंटाळली, अल्पवयीन लायब्ररीत गेली आणि..
छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात घडलेली ही धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. एका खासगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने शाळेच्या अभ्यासिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण अधिकच संतापजनक आहे—मुख्याध्यापकाकडून होत असलेला सततचा लैंगिक छळ, छेडछाड आणि मानसिक त्रास. विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
सुसाईड नोटमध्ये काय नमूद होते?
Ans: छत्तीसगडमध्ये ही घटना घडली.
Ans: दिवाणजीचे अपहरण करून त्यांना वाचवायला गेलेल्या कंत्राटदाराची हत्या केली.
Ans: पोलिसांनी तपास सुरू केला असून नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.