
crime (फोटो सौजन्य: social media)
रामकृष्ण वसंतराव राऊत (७५) आणि रामराव महादेवराव वांगे (४५, रा. मारुती वॉर्ड) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर शहजाद (ताज बेकरीवाला) आणि गुल्हाणे हे किरकोळ जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.२१) सकाळी १०:१५ वाजता आर्वीच्या भाजी मंडई परिसरात घडली. नागरिकांनी घाबरून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने भीतीचे वातारण पसरले आहे.
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव मथुरेश ऊर्फ मतेश गजानन लाडके (२२, रा. नेताजी वॉर्ड) असे आहे. तो मानसिक रुग्ण आहे. आधी त्यांने घरात आजीसोबत वार करून तिला मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात नग्नावस्थेत बाहेर येऊन शहजादला उचलून जमिनीवर आपटले. त्यानंतर तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साधना आश्रम परिसरात गेला. तिथे त्याने रामकृष्ण राऊत यांच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार केला. यात राऊत यांच्या डोक्याचे दोन तुकडे झाले. हा प्रकार पाहून नागरिक घाबरले आणि तेथून पळ काढला.
घटनास्थळापासून शंभर फूट अंतरावरच उपविभागीय कार्यालय आहे. आवाज ऐकताच तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळ गाठले. पोलीस कर्मचारी खंडाळे व एकाने मनोविकृताला पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र त्याने हातातील झोडपा पोलिसांना मारला. त्यांनी तो अडविला दरम्यान त्याने दुसरा दंडुका मारला त्यामुळे खंडाळे यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले.
दुसऱ्या कर्मचाऱ्याने सावधानता बाळगत मनोरुग्णावर मागून झोडपा मारला असता तो खाली पडला तेव्हा नागरिक मदतीला धावले व त्यांनी मनोरुग्णाला पकडून हातपाय बांधले. या माथेफिरू ने आणखी कोणाला मारू नये म्हणून त्यांनी लाठीकाठी आणि दोरीच्या साहाय्याने त्यास पकडून ठेवले. त्याचे हात आणि पाय बांधून पोलिस ठाण्यापर्यंत नेले. तिथे त्याला डांबण्यात आले.
पोलीस तपास सुरु केला
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्षदर्शी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तासभर थांबून वस्तुस्थिती आणि पार्श्वभूमी समजून घेतली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. जखमींना उपजिल्हा रुग्णालय आणि नंतर सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले.
तीन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली
या मनोरुग्ण मथुरेशच्या हल्ल्यात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, गंभीर जखमी तरुणांचाही उपचारादरम्यान सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झाला. मथुरेशला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला तीन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. डॉक्टरांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. त्याच्यावर दहा वर्षापासून अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचार सुरू होते. अशी माहिती चंद्रशेखर ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिली.
Satara Crime: पाय बांधून दगडाने ठेचलं! ऊसतोड मजुराची हत्या, आरोपीने विष पिऊन संपवण्याचा प्रयत्न
Ans: आर्वी शहरातील भाजी मंडई परिसरात.
Ans: मथुरेश उर्फ मतेश गजानन लाडके (२२), मानसिक रुग्ण.
Ans: आरोपीला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवून अहवालानंतर कायदेशीर कारवाई.