
crime (फोटो सौजन्य: social media)
Satara Crime: पाय बांधून दगडाने ठेचलं! ऊसतोड मजुराची हत्या, आरोपीने विष पिऊन संपवण्याचा प्रयत्न
काय नेमकं घडलं?
गडचिरोली येथील पतसंस्थेत अभिकर्ता म्हणून काम करणारे रवींद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (वय 49, रा. नागेपल्ली) हे 18 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता “पतसंस्थेत पैसे भरायला जातो” असे कुटुंबीयांना सांगून घराबाहेर पडले होते. त्यांनी पैसे जमा केले मात्र ते रात्रीपर्यंत परत आले नाहीत. मुलांनी वडील बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळवले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलांनी शोधायला सुरुवात केली. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नागमाता मंदिराजवळ त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. धारदार शास्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. ठसेतज्ज्ञ व न्यायवैद्यक शास्त्राच्या पथकाला पाचारण करून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. तसेच दोन स्वतंत्र पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. पोलिसांनी ४८ तासात या हत्येचा छडा लावत आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव समय्या मलय्या सुंकरी (वय 35, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) असे आहे.
कशी केली हत्या?
आरोपी समय्या याला प्रचंड दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने मित्र रवींद्र यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पाहून ती लुटण्याचा
कट आखला. त्याने आधी आरडी काढायची आहे असे सांगत रवींद्र यांना फोन करून बाहेर बोलावले. त्यांनतर दोघेही सिरोंचा मार्गावरील नागमंदिर परिसरातील निर्जन स्थळी गेले. तिथे त्यांनी दारु पिली. त्यानंतर रवींद्र पूर्णपणे नशेत असल्याची खात्री झाल्यावर आरोपीने सत्तूरने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी रवींद्र यांनी हाताने प्रतिकार केला तेव्हा त्याने त्यांच्या बोटांवर घाव बसून बोटे कापली. त्यानंतर रवींद्र यांचा मृत्यू होईपर्यंत त्याने सत्तूरने अनेक वार केले. अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
आरोपीला पोलीस कोठडी
हत्या केल्यानंतर त्याने सोन्याची चैन घेतली तिथून तो फरार झाला. त्याला वाटलं आपण पकडले जाणार नाही. मात्र, पोलिसांच्या कठोर तपासामुळे तो पकडले गेला. न्यायालयाने आरोपीला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
Akola news: “तुझ्याशिवाय जगू शकत नाही…” प्रेमविरोधामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
Ans: सोन्याची चैन लुटण्यासाठी.
Ans: समय्या मलय्या सुंकरी (35), मित्र.
Ans: आरोपी पोलीस कोठडीत; पुढील तपास सुरू.