काय घडलं नेमकं?
घडलेली घटना २ एप्रिल रोजी कोरबा जिल्ह्यात पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सात वर्षीय मुलगा शेजारच्या इतर मुलांसोबत तलावात अंघोळ करण्यासाठी घराबाहेर गेला होता. त्याचवेळी आरोपी तिथे आला आणि त्याने फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने मुलाला आपल्यासोबत नेले. तिथे त्या तरुणाने मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने विरोध केल्यावर रणजितला राग आला. त्याने मुलाला मारहाण केली आणि दगड उचलून मुलाच्या डोक्यावर व शरीराच्या इतर भागांवर अनेक वेळा वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला. एवढेच नाही तर त्याने मुलाला उचलले आणि शेतातील एका विहिरीत फेकून दिले.
यावेळी तलावात अंघोड करत असतांना काही मुलांना आरोपीला मुलाला घेऊन जात असताना पाहिले. हत्या केल्यानंतर रणजित संध्याकाळी घरी परतला. मात्र पीडित मुलगा घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र मुलगा कुठे भेटला नाही. त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलाचा शोध घेतला असता त्यांना गावातील एका विहिरीत पीडित मुलाचा मृतदेह आढळला. याप्रकरणाचा सखोल तपास केला असता पोलिसांनी तरुणाला बेड्या घातल्या. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
झोपडीत बोलावले, दारू पाजली, नंतर गुप्तांगात लाकडी दांडा….; जादूटोण्याच्या संशयातून महिलेची हत्या
छत्तीसगड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात जादूटोण्याचा संशयावरून महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. आधी तिला झोपडीत नेले नंतर तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि तिच्या गुपतंगात लाकडी दांडा घुसवून बेदम मारहाण केली. नंतर तिची हत्या केली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेने परिसर हादरून गेली आहे. ही घटना जशपूरनगर जिल्ह्यात सन्ना पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, ताबा मिळावा म्हणून SIT चा अर्ज
Ans: छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात, पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत.
Ans: फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने मुलाला सोबत नेले.
Ans: काही तासांत आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला.






