Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच कैद्यांमध्ये राडा; एक गंभीर जखमी

सुमितने सिद्धेशला भाजी दिली. काही वेळाने सिद्धेशने हातातली भाजी आणून भाजी भांड्यात टाकली. यावरून सुमित आणि सिद्धेशमध्ये भांडण सुरू झाले. या दरम्यान सिद्धेशने त्याचा मित्र मनोजसोबत मिळून सुमितच्या डोक्यावर तेथेच ठेवलेल्या भांड्याने प्रहार केला. डोक्यातून रक्ताची धार लागली. कर्तव्यावर हजर असलेल्या कारागृह रक्षकांनी धाव घेत सुमितची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. त्याला उपचारासाठी मध्यवर्ती कारागृह रुग्णालयात दाखल केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2024 | 10:44 AM
मध्यवर्ती कारागृहात 3 कैद्यांमध्ये हाणामारी; एक गंभीर जखमी

मध्यवर्ती कारागृहात 3 कैद्यांमध्ये हाणामारी; एक गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा जेवणावरून तीन कैद्यांमध्ये हाणामारी झाली. यात 2 कैद्यांनी जेवण देणाऱ्या तिसऱ्या कैद्याच्या डोक्यावर भांडी मारत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.

हेदेखील वाचा : डोळे, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा…,लैगिंक अत्याचारानंतर हत्या! कोलकात्याच्या ‘निर्भया’ हत्येचे गुढ असे उकलले

सुमित आनंद मून असे जखमी कैद्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धेश सतीश घाडगे आणि मनोज प्रकाश वाघमारे अशी आरोपी कैद्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी कैद्याला कारागृहात जेवण वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या गुरूवारी सायंकाळच्या सुमारास हे दोन्ही कैदी सुमितकडे जेवण घेण्यासाठी आले होते. सुमितने सिद्धेशला भाजी दिली. काही वेळाने सिद्धेशने हातातली भाजी आणून भाजी भांड्यात टाकली. यावरून सुमित आणि सिद्धेशमध्ये भांडण सुरू झाले. या दरम्यान सिद्धेशने त्याचा मित्र मनोजसोबत मिळून सुमितच्या डोक्यावर तेथेच ठेवलेल्या भांड्याने प्रहार केला. डोक्यातून रक्ताची धार लागली.

दरम्यान, कर्तव्यावर हजर असलेल्या कारागृह रक्षकांनी धाव घेत सुमितची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. त्याला उपचारासाठी मध्यवर्ती कारागृह रुग्णालयात दाखल केले. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून दोन्ही कैद्यांवर धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

येरवडा येथील कारागृहातही हाणामारी

काही दिवसांपूर्वी विरोधी गटातील गुन्हेगारांना माहिती पुरवित असल्याच्या कारणावरून एका कैद्याला मारहाण करण्यात आल्याची घटना येरवडा कारागृहात घडली. याप्रकरणी तीन कैद्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असताना आता नागपूरच्या कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

हेदेखील वाचा : रेल्वे प्रवासादरम्यान विदेशी पिस्तुल आणि 14 काडतुसे घेऊन जाणाऱ्या आरोपी मॉडेलला अटक

Web Title: Clashes between prisoners in central jail of nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • Nagpur Central Jail
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
1

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
2

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका
3

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
4

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.