
नागपुरात 'दृश्यम' स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू...
नागपूर : बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनगावच्या जंगलात जमिनीत पुरलेला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दर्शन ऊर्फ दिनेश मसराम (वय ३८) असे मृताचे नाव आहे. हत्या करून पुरावे लपवण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात पुरण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. मृतदेह पुरण्याची पद्धत आणि घटनास्थळी आढळलेल्या वस्तूंमुळे या घटनेची तुलना ‘दृश्यम’ चित्रपटातील कथानकाशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनची मानसिक स्थिती काही दिवसांपासून ठीक नव्हती. शनिवारी तो घरातून बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. अनेक ठिकाणी चौकशी करूनही दर्शनचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर सोमवारी सकाळी कुटुंबीयांनी बुटीबोरी पोलिस ठाणे गाठून तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
दरम्यान, दर्शन अंजनगावच्या जंगलात असण्याची शक्यता असल्याची माहिती एका नातेवाइकाने पोलिसांना दिली. त्याने दर्शनची हत्या करून मृतदेह जंगलात पुरला असावा, अशीही शक्यता व्यक्त केली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंजनगावच्या जंगलात शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना पोलिसांना जंगलातील एका ठिकाणी जमीन संशयास्पद स्थितीत आढळली.
बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
घरखर्चात हातभार लावण्यावरून बाप-लेकात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. संतापलेल्या मुलाने स्क्रू ड्रायव्हर उचलून वडिलांच्या पोटात भोसकला. ही खळबळजनक घटना लकडगंज पोलिस ठाण्यांतर्गत गंगाबाई घाट, गरोबा मैदान परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी मृत्यू झाला.
आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं
आयटी इंजिनिअरने कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला आहे. नंतर त्याने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. देहूगाव येथे रविवारी (दि.20) सकाळी 10:45 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. शुभांगी आकाश बारस्कर (वय 28, रा. देहूगाव, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती आकाश रामदास बारस्कर (वय 26, रा. देहूगाव) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.