Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका

Nagpur News : नागपुरात ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) नसलेल्या सुमारे ३ हजार इमारती प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकामांवर कारवाईची तयारी सुरू असून, संबंधित बिल्डरांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 22, 2026 | 02:42 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ७०० जणांना नोटीस ;कारवाईचा इशारा
  • अनधिकृत बांधकामांना आळा
  • इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटची तपासणी नाही
  • घर खरेदीदारांची होतेय कोंडी
Nagpur News : शहरात बांधकामाचे नियम धाब्यावर बसवून इमारती उभारल्या जात असल्याचे नगररचना विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. तब्बल ३ हजार इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेले नसून, मनपाच्या कागदोपत्री नोंदीनुसार या इमारती अद्याप अपूर्ण अथवा बांधकामाधीन आहेत. प्रत्यक्षात मात्र या इमारतीमध्ये हजारो कुटुंबे राहत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत नागपूर मनपाने पहिल्या टप्प्यात ७०० बिल्डर आणि इमारत मालकांना कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.

नगररचना विभागाने २०२१ ते २०२४ या कालावधीत मंजूर केलेल्या बांधकाम नकाशांची तपासणी केली. त्यातून ओसी न घेताच इमारतींचा वापर सुरू असल्याचे आढळले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ओसी मिळविण्याची जबाबदारी बिल्डरची असते.

मात्र, फ्लॅटची विक्री करून संपूर्ण रक्कम घेतल्यानंतर अनेक बिल्डर्सनी ओसी घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. दुसरीकडे, घर खरेदीदारांनीही ओसीची खातरजमा न करता फ्लॅट खरेदी केल्याने सध्याच्या परिस्थितीत ते अडचणीत सापडले आहेत. ओसी नसलेल्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षा, संरचनात्मक सुरक्षितता आणि पार्किंगसह आवश्यक निकषांची पूर्तता झाली आहे की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

७०० जणांना नोटीस ;कारवाईचा इशारा

मनपाने पहिल्या टप्प्यात ७०० इमारत मालक आणि बिल्डर्सना नोटिसा बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित इमारतीचे पाणी आणि ड्रेनेज कनेक्शन तोडण्यात येईल. तसेच मालमत्ता करावर दुप्पट दंड आकारला जाणार असून, त्यानंतरही नियमभंग कायम राहिल्यास इमारत सील करण्याची कारवाई केली जाणार आहे.

अनधिकृत बांधकामांना आळा

येत्या १५ दिवसांत आणखी २ हजार ३०० इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालणे आणि बांधकाम नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटची तपासणी नाही

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती रहिवाशांसाठी सुरक्षित आहे की नाही, याची तपासणी करून मनपा भोगवटा प्रमाणपत्र जारी करते. यामध्ये फायर सेफ्टी, पार्किंग आणि स्ट्रक्चरल सेफ्टी यांसारख्या बाबी तपासल्या जातात. मात्र, शहरातील ३ हजार इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच फायर सेफ्टी तपासणी झालेली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यास या इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

घर खरेदीदारांची होतेय कोंडी

ओसी नसल्याने अनेक घरखरेदीदारांना गृहकर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर फ्लॅटची पुनर्विक्री करतानाही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी संबंधित इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही, याची खातरजमा करावी, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Nagpur news 3000 buildings lack oc builders hit with notices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News
  • Top Marathi News Today

संबंधित बातम्या

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
1

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
2

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
3

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?
4

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.