crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नवी मुंबई: नवी मुंबईतील हाय वे वरून क्लिनर मिक्सर प्रल्हाद कुमार याच अपहरण केल्या प्रकरणात मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दिलीप खेडकर याने कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. अर्जावर युक्तिवाद करत असताना पोलिसांनी आरोपीला जामीन देण्यात येवू नये अन्यथा त्याचा तपासावर परिणाम होईल अस सांगितलं. दिलीप खेडकर यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करत असताना प्रल्हाद कुमार याला कोणतीही मारहाण केली नसल्याचा दावा केला. दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी अपहरण केल्या प्रकरणात या दोघांची चौकशी नवी मुंबई पोलिसांना करायची होती. मात्र ते दोघे अजून नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलिसांत चकवा देत अटक टाळण्यासाठी दिलीप खेडकर याने कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे.
सरकारी वकील आणि पोलिसांचा काय दावा
सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत असताना आरोपीला जर जामीन दिला तर त्याचा चौकशीवर परिणाम होईल. आरोपी हा उच्च शिक्षित आहे. अपहरण केल्यावर प्रल्हाद कुमार याला त्यांनी घराच्या तळघरात नेवून ठेवलं. रात्रभर त्याचा फ़ोन बंद ठेवला. हा अपहरण आणि खंडणीचा गुन्हा आहे त्यामुळे आरोपीला जामिन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद नवी मुंबई पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी कोर्टात दिली माहिती
पोलिसांनी दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्या वर्तणुकीविषयी माहिती दिली. पोलिस तपासासाठी घरी गेले असता त्यांच्या अंगावर कुत्रे सोडण्यात आली. ते अजूनही पोलीस तपासाला सहकार्य करत नाहीत. घरातील त्यांनी सीसीटीव्ही रेकॉर्ड गायब केल आहे. गुन्ह्यात त्यांनी जी गाडी आणि मोबाईल वापरला तो गायब केला आहे. आरोपी फरार झाल्यानंतर त्याने कोणाशी संवाद साधला याचा तपास आम्हाला करायचा आहे. या आधी आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यासाठी आम्हाला याचा तपास करायचा आहे. कोर्टात ही माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.
मनोरमा खेडकर महिला असल्याचा फायदा घेतात
याच प्रकरणात दिलीप खेडकर याची पत्नी मनोरम खेडकर हिची चौकशी करायची आहे. चौकशी करत असताना ते पोलिसांत सहकार्य करत नाहीत. चौकशीची वेळ ही १० ते ६ दिलेली असताना ते सायंकाळी चौकशीस येतात. सूर्यास्तानंतर चौकशी करता येत नाही. त्यामुळे याचा ते गैरफायदा घेत आहेत. असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला.
दिलीप खेडकरला जामीन मिळू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी त्यांचे कारनामे मांडले आहेत. आरोपीने घरात डांबून ठेवल्यावर शिळे अन्न खायला दिले असे प्रल्हाद कुमार याने जबाबात नोंदवलं आहे. मात्र कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतलं आहे. कोर्ट आता यावर काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.